Jhund Video: नागराजचा ‘झूंड’ नेमका कसाय? अभिनेता जितेंद्र जोशी म्हणतो, बच्चनगिरी..!

मी विद्रूप दिसतो म्हणून. पण आरशात तर मला बघावाच लागतो की हा चेहरा. मग मी तो कुठे लपवणार आहे. मला माहितीचय की जखम आहे माझ्या चेहऱ्यावर. झूंड एक्झॅटली तसा आहे. झूंड हा तो चेहरा आहे. हा चेहराय. अजिबात न लपवलेला. विदाऊट मेक अप.

Jhund Video: नागराजचा 'झूंड' नेमका कसाय? अभिनेता जितेंद्र जोशी म्हणतो, बच्चनगिरी..!
अभिनेता जितेंद्र जोशीने झूंडवर इन्स्टा लाईव्ह करत नागराजची स्तुती केलीय.Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:13 PM

नागराज पोपटराव मंजुळेंचा झूंड (Jhund) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. त्याला विविध कारणे आहेत. काहींच्या प्रतिक्रिया सकारात्मक आहेत तर काहींच्या नेगेटीव्ह. आमिर खान, धनुषपासून ते अनेकांना झूंड मास्टरपीस वाटतोय तर काहींना अनेक गोष्टी खटकतायत. त्यातल्या त्यात मराठी हिरो हिरोईन मात्र अजून तरी फारसं नागराजच्या (Nagraj Manjule) सिनेमावर बोलताना दिसत नाहीयत. पण याला एक अपवाद आहे आणि तो म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi). झूंड पाहिल्यानंतर जितेंद्रने इन्स्टा लाईव्ह केलंय. त्यात त्यानं हा सिनेमा नेमका कसा आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे जितेंद्रच्या चेहऱ्यावर जखमा आहेत आणि त्या तशा असतानाही जितेंद्र लाईव्ह आला. त्यानं तेही झूंडशी जोडलंय.

जितेंद्र जोशी म्हणतो !

झूंड हा एक असा सिनेमा आहे. मी असा चेहरा घेऊन लाईव्ह का करतोय. मी पडलो, मला लागलं. तर मी काही स्पेक्ट शोधत होतो की हे लपेल. मग माझ्या मनात विचार आला की मी हे का लपवतोय. हा माझाच तर चेहरा आहे. हा चेहरा माझा असून लपवायची गरज काय? का तर मला लागलं म्हणून. मी पडलो म्हणून. मी विद्रूप दिसतो म्हणून. पण आरशात तर मला बघावाच लागतो की हा चेहरा. मग मी तो कुठे लपवणार आहे. मला माहितीचय की जखम आहे माझ्या चेहऱ्यावर. झूंड एक्झॅटली तसा आहे. झूंड हा तो चेहरा आहे. हा चेहराय. अजिबात न लपवलेला. विदाऊट मेक अप.

काही भोगतात काही उपभोगतात!

जितेंद्र पुढे म्हणतो, नागराज आजवर जे जगलाय, जे त्यानं भोगलाय, काही माणसं उपभोगतात, काही माणसं भोगतात, काही माणसं भोगून, उपभोगून तुम्हाला म्हणतात की बघा. नागराज मंजुळे हा माणूस तुमची गचांडी धरत नाही. तो फक्त हलगी वाजवत रहातो. हलगी वाजवून वाजवून, काय ग्रेटेस्ट गोष्टी केल्यात त्यानं ह्या सिनेमात? ही एक फनटॅस्टिक फिल्म. मी तीन दिवसांपूर्वी बघितली. मला त्याच्या टीमला भेटायचंय. म्हणजे काय काम केलंय त्याच्या टीमनं. म्हणजे अमिताभ बच्चनला, म्हणजे असा बच्चनच नाही पाहिला मी. अनेक वर्षात असे परफॉर्मन्सच नाही पाहिले. सगळ्या नवीन पोरांनी असे परफॉर्मन्स दिलेत. नागराज आणि टीम. काय टीमय? काय बोलतो हा सिनेमातनं? श्रद्धेविषयी जे बोलतो, माणूसकीविषयी जे बोलतो. त्या झोपडपट्टीविषयी जे बोलतो, यह है मेरा झोपडपट्टी.

ही जी झोपडपट्टी आहे ती कुणाची आहे?

झूंडमधल्या झोपडपट्टीविषयी जितेंद्र म्हणतो- मला आठवतंय शाळेत जाताना सेंट जॉन स्कूलमध्ये जाताना भोकरवाडी-राजेवाडी नावाची झोपडपट्टी होती. काही काही मुलं यायची नाहीत तिथून. मनात भीती भरलेली होती. बोललं जातं ना ऐ तिथून नको जाऊ, तिकडं झोपडपट्टीय. काय असते झोपडपट्टी, कोण आहेत ही माणसं? ही माणसं कोण आहेत, विदाऊट मेक अप वावरणारी. झूंडमध्ये बच्चनसाहेबांच्या तोंडी संवादय की, ये लोग पत्थर बहोत जोरसे फेकते है तो काच तोड सकते है इनके हात मे अगर बॉल थमा दी जाय तो फास्ट बोलर बन सकते है. विश्व के सबसे तेज गेंदबाज बन सकते है. काही नाहीये हो त्या पोरांकडे आणि पोरं कोण आहेत ही? ही कोणाची पोरं आहेत? ही जी आता माझी मुलगी इथं बसलीय ती आणि झोपडपट्टीमधली मुलगी काय फरक आहे? तिच्या आईबापाचं पण तिच्यावर तसच प्रेम असणार आहे ज्याप्रमाणं मी हिला खाऊपिऊ घालतोय. आपण हळूहळू फरक करायला लागतो आणि मला एक विनंतीय. कृपया आपआपल्या मुलांना दाखवा हा सिनेमा.

सगळ्यात गेट्रेस्ट गोष्ट काय नागराजची?

नागराजबद्दल बोलताना जितेंद्र म्हणतो, सगळ्यात गेट्रेस्ट गोष्ट काय नागराजची की, त्याच्या प्रत्येक कवितेत त्याचं जगणं आलंय पण ती कविता एक लाखनं गुणून त्यानं पडद्यावर आणली. आणि त्यानं ती दाखवली कविता. आणि ती कविता आपली होते. त्यानं फँड्री केला होता ना, तेव्हा अनेक लोकांना मागे लागून, बघा बघा फँड्री बघा. तर मला असं सांगितलं की , डुकराच्या मागे जाणाऱ्या माणसाची काय कथा असते व्हय. पण त्याचं जगणं आहे ना मग. म्हणजे तो जगलाय, तो जगत असताना तुम्ही ते जगणं त्याला दिलंत समाजाने. त्याच्या जगण्याविषयी तो आता भाष्य करतोय तर तेही तुम्हाला नाही चालत होय. बरं आणखी एक गोष्ट करायला लागला ना तो. त्याचा बिजनसही करायला लागला. बरं त्याचे पैसे असतात ना. सेट लावायला. अमिताभ बच्चन काय फुकट काम करत असन का? त्या सैराटनं एवढे पैसे मिळवून दिले इंडस्ट्रीला. मग सैराटनंतर काय नागराजय, अरारारा. नाही तो हे सगळे ठोकताळे बाजुला ठेवतो आणि सिनेमा बनवतो. झूंड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.

अमिताभ बच्चनच्या बच्चनगिरीबद्दल

अमिताभ बच्चन यांच्या रोलबद्दल जितेंद्र म्हणतो- अमिताभ बच्चनला, काही बच्चनगिरीच करु दिली नाही त्या माणसानं. लय डेंजर, फारच डेंजर पिच्चर बनवला. म्हणून मग मी विचार केला, जाऊयात ना लाईव्ह याच चेहऱ्यासह. सांगुयाना सगळ्यांना. हा चेहरा आहे तो झूंड. कळकळीची विनंतीय माझी, तुम्ही जा थिएटरला आणि झूंड बघा. झूंड पहाताना रडू येतं आतमध्ये. कारण ना त्या झोपडपट्टीतला एक पोरगा म्हणतो की मेरे को कोई पुछा नही आज तक की तू कैसा है.

हे सुद्धा वाचा:

अमिताभ बच्चन यांनी ‘झूंड’चं एक दिवसही प्रमोशन का केलं नाही? चर्चांना उधाण, चांगला पिक्चर रखडतोय?

“इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, ‘झुंड’वर टीकेचे बाण

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.