दारु आणि जुगारापासून लोकांनी कस लांब राहावं; पॅरोलवर बाहेर आलेल्या बाबा राम रहिमचं नव गाण
राम रहिम बलात्कारात दोषी ठरलाय

नवी दिल्ली : गंभीर गुन्हा सिद्ध झाल्यास माणसाला आजन्म तुरुंगात खितपत पडावं लागतं. हे गृहीतक बाबा राम रहिमला लागू होत नाही. बलात्काराचा गुन्हा सिद्ध झालेल्या बाबा राम रहिमला तुरुंगातून 40 दिवसांची पॅरोल सुट्टी मिळालीय. आणि या 40 दिवसात बाबा राम रहिमनं अनेक कामांचा सपाटा लावला. मागच्या काही दिवसात राम रहिमच्या या गाण्याला ४२ लाख लोकांनी यूट्यूबवर पाहिलंय. विशेष म्हणजे जो राम रहिम बलात्कारात दोषी ठरलाय. त्यानं पॅरोलवर बाहेर पडून दारु आणि जुगारापासून लोकांनी लांब राहावं, यासाठी नवीन गाणं तयार केलंय.
बाबा राम रहिमची त्याची कथित शिष्या हनीप्रीतचं नवं नामकरण केलंय हनीप्रीतचं नाव बदलून तिला आता रुहानी दीदी असं ठेवण्यात आलंय. विशेष म्हणजे हनीप्रीतचं मूळ नाव प्रियंका तनेजा आहे. 1999 मध्ये राम रहिमनंच प्रियंका नाव बदलून हनीप्रीत ठेवलं होतं. आता पुन्हा हनीप्रीतऐवजी रुहानी दीदी नामकरण केलंय.
पॅरोलच्या सुट्टीवरच असताना राम रहिमनं हरियाणाच्या बागपथमध्ये एका कथा कार्यक्रमाचंही आयोजन केले. ज्याला अनेक राजकीय नेतेमंडळी उपस्थित होती.
राम रहिमवर हत्या आणि बलात्तकाराचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यासाठी 20 वर्षांची कैदही सुनावली गेलीय. मात्र, तरीही राम रहिमला माणणारा वर्ग आणि त्या वर्गामुळेच अनेक राजकीय मंडळी राम रहिम पॅरोलवर सुटल्यानंतर त्याच्या दरबारात हजेरी लावतात.
योगायोगानं जेव्हा-जेव्हा निवडणुका तोंडावर असतात. तेव्हा-तेव्हा राम रहिमला सुट्टी मंजूर होते. यावेळी हरियाणात नगर पंचायतींच्या निवडणुका आहेत.
त्याआधी जुनमध्ये जेव्हा 46 नगर परिषदांच्य निवडणुका होत्या. तेव्हा राम रहिमला सुट्टी मंजूर झाली. फेब्रुवारीत जेव्हा पंजाबच्या निवडणुका झाल्या, तेव्हा सुद्धा राम रहिम सुट्टी घेऊन तुरुंगाबाहेर आला होता.
कोर्टानं दोषी ठरवलेल्या अशा कथित बाबांच्या कार्यक्रमात नेते येतात. मात्र, सामान्य लोकांची गर्दी सुद्धा भूवया उंचावणारी असते. जेव्हा आसाराम बापूवर बल्ताकाराचे आरोप लागले. तेव्हा सुद्धा जेल आणि कोर्टाबाहेर आसाराम बापूच्या समर्थकांची अशी गर्दी उसळत होती.
