AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई तुळजाभवानी’च्या भूमिकेसाठी कशी झाली अभिनेत्रीची निवड? घेतल्या गेल्या 350-400 ऑडिशन्स

कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे मुख्य भूमिका साकारतेय. तुळजाभवानीच्या भूमिकेसाठी मालिकेच्या टीमकडून असंख्य ऑडिशन्स घेतल्या गेल्या होत्या. त्यापैकी पूजाची निवड कशी झाली, त्याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं आहे.

'आई तुळजाभवानी'च्या भूमिकेसाठी कशी झाली अभिनेत्रीची निवड? घेतल्या गेल्या 350-400 ऑडिशन्स
Pooja KaleImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 10, 2025 | 12:24 PM
Share

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय. यामध्ये अभिनेत्री पूजा काळे ही आई तुळजाभवानीची भूमिका साकारतेय. या भूमिकेसाठी तिची निवड कशी झाली, मालिकेत काम करण्याचा तिचा अनुभव कसा आहे, याविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली.

आई तुळजाभवानी मालिकेचा अनुभव कसा आहे?

– लहाणपणापासून सुरू असलेला नृत्याचा रियाज आणि माझी नृत्याची प्रचंड आवड यामुळे मालिका करताना जेव्हा कुठे नृत्याचा टेक असेल तेव्हा मी खूप खुश असते. अभिनयासाठी हावभाव करताना नृत्याचा फायदाच होता. पौराणिक कथांचे नृत्यामध्ये आम्ही सादरीकरण करतो. अशावेळी अंग, प्रत्यंग, उपांगाचा वापर होऊन नवरस सादर करतो. ती सवय असल्याने अभिनय करायला सोपे जाते. आई तुळजाभवानी मालिकेची विचारणा जेव्हा झाली तेव्हा माझ्या मनात चटकन उत्तर आलं होतं नक्कीच करायची आहे मला ही मालिका… कारण तुळजाभवानीसोबत माझ्या घराचं जुन नातं आहे, आमची ती कुलस्वामिनी आहे. नृत्यात मी अनेकदा तांडव सादर केले आहे. पण, साक्षात तेच साकारायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते. आई तुळजाभवानी मालिकेसाठी 350 ते 400 हून अधिक ऑडिशन घेतल्या गेल्या होत्या. ज्यातून माझी निवड झाली. माझ्या नशिबात ही मालिका लिहिली होती असं म्हणायला हरकत नाही. देवीचीच इच्छा असावी म्हणून माझ्यापर्यंत ही मालिका आली.

नृत्याचं शिक्षण कुठून घेतलंस?

– मी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, मिरजमधून भरतनाट्यम नृत्यात विशारद पूर्ण करून अलंकार करत आहे. मी अगदी तीन वर्षाची होते तेव्हापासूनच आमच्या नटराज नृत्यालयाच्या वार्षिक नृत्यउत्सवात स्टेज परफॉर्मन्स करत आले आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्याबरोबर संपूर्ण भारतातील लोकनृत्य करायला मिळाले. इतकंच नाही तर वेस्टर्न नृत्यही त्यामुळे शिकायला मिळालं. गुरू मुक्ताबाला जोशी आणि गुरू अमृता साळवी यांच्याकडे कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं. ओडिसी, मोहिनियत्तम, कुचीपुडी नृत्यदेखील मी करते. पण, नृत्यासोबतच शास्त्रीय गायन मी श्री मनोज माळी ह्यांच्याकडे शिकले आहे.

मालिकेत तांडव नृत्य केलंस त्याचा अनुभव सांगशील ?

– जेव्हा मला कळलं मालिकेत असा सीन आहे तेव्हा मी खूप खुश झाली. कारण नृत्य हा माझा खूपच जवळचा विषय आहे आणि आता मला ते मालिकेत सादर करण्याची संधी मिळते आहे त्यामुळे मला खूपच आनंद झाला. शूटिंग आणि प्रत्यक्षात सादर करणं यात निश्चितच खूप फरक आहे. पण, मालिकेत तांडव मी ऑन द स्पॉट केलं होतं. मला आमचे दिगदर्शक सर बोले की तांडव सादर करायचा आहे. कधीपर्यंत प्रॅक्टिस करुन आपण शूट करुयात. तेव्हा मी म्हणाले ऑन द स्पॉट केलं तरी चालेल. मी तांडव सादर करण्याआधी अजिबात रियाझ केला नाही कदाचित देवीनेच मला तेव्हा बळ दिलं.

लहानपणापासून नृत्याशी काही संबंध आहे का?

– आई नृत्य दिग्दर्शिका असल्याने अनेक म्युझिक अल्बममध्ये तिच्या विद्यार्थ्यांसोबत नृत्य सादर केलं आहे. तेव्हा मी सतत तिच्या बरोबर असायचे. त्यामुळे कोळी नृत्य, जागरण गोंधळ, जोगवा हे सर्व प्रकार पाहत आले आणि करतही आलेय. शास्त्रीय नृत्याची माझी गुरू अर्थात माझी आई राजश्री काळे आहे. श्री विक्रमन पिल्लई, श्री दीपक मुजूमदार हे माझे गुरू आहेत.

मालिकेच्या व्यग्र वेळापत्रकातून तू नृत्यासाठी कसा वेळ काढतेस?

– नृत्य शिकत असताना आपल्याला वेळात वेळ काढावाच लागतो. मला नृत्याची खूप आवड आहे, त्यामुळे मालिकेच्या हेक्टिक शेड्युलमधून मी रियाझसाठी थोडा वेळ तरी काढते. मालिकेमध्ये तांडव किंवा कोणतेही नृत्य करायचे असल्यास मी खूप जास्त उत्सुक असते. मी जवळ जवळ सगळेच डान्स स्टाइल शिकले आहे, त्यामुळे मला खूप सोपं जातं.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.