Hruta Durgule: हृता दुर्गुळेने हनिमूनसाठी निवडली खास जागा; सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो

अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने नुकतीच दिग्दर्शक प्रतीक शाहशी (Prateek Shah) लग्नगाठ बांधली. 18 मे रोजी हृता आणि प्रतीकचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर या दोघांनी हनिमूनसाठी खास जागा निवडली आहे.

Hruta Durgule: हृता दुर्गुळेने हनिमूनसाठी निवडली खास जागा; सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो
Hruta Prateek
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 22, 2022 | 1:14 PM

‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत दिपूची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने नुकतीच दिग्दर्शक प्रतीक शाहशी (Prateek Shah) लग्नगाठ बांधली. 18 मे रोजी हृता आणि प्रतीकचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर या दोघांनी हनिमूनसाठी खास जागा निवडली आहे. हृता पतीसोबत इस्तांबूलला (Istanbul) फिरायला गेली असून इन्स्टा स्टोरीवर तिथले रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. प्रतीक आणि हृता सध्या तुर्कीत एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. तिथल्या खास जेवणाची चव चाखताना, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देताना आणि शॉपिंग करतानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. इस्तांबूलमधील ग्रँड बाजारमधील हा फोटो हृताने शेअर केला आहे. ‘इस्तांबूल’, असं लिहित तिने ‘हनिमून’ हा हॅशटॅग दिला आहे.

एका कार्यक्रमात हृताची पहिल्यांदा ओळख प्रतीकशी झाली आणि पहिल्याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या वर्षी प्रतीकसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करत हृताने नात्याची जाहीर कबुली दिली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा पार पडला. हृता सध्या ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय. याशिवाय तिचे ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास 3’ हे चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

हे सुद्धा वाचा

कोण आहे हृताचा पती?

प्रतीक शाह हा हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. अभिनेत्री मुग्धा शाह यांचा तो मुलगा आहे. प्रतीकने ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदगी’ यांसारख्या हिट टेलिव्हिजन मालिकांचं दिग्दर्शिन केलं आहे. प्रतीक हा उत्तम डान्सरसुद्धा आहे. त्याच्या डान्सचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें