AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Huma Qureshi | चित्रपट समीक्षकाचे बोलणे ऐकून ढसाढसा रडायला लागली हुमा कुरेशी, थेट वजनावर हे भाष्य, अभिनेत्री म्हणाली…

बाॅलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिने 2012 पासून आपल्या करिअरला सुरूवात केलीये. हुमा कुरेशी हिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. हुमा कुरेशी हिने नुकताच एक मुलाखत दिलीये, ज्यामुळे सध्या ती प्रचंड चर्चेत आहे.

Huma Qureshi | चित्रपट समीक्षकाचे बोलणे ऐकून ढसाढसा रडायला लागली हुमा कुरेशी, थेट वजनावर हे भाष्य, अभिनेत्री म्हणाली...
| Updated on: Jul 10, 2023 | 3:57 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे हुमा कुरेशी हिला 2012 मध्ये अनुराग कश्यप यांनीच लाॅन्च केले आहे. हुमा कुरेशी आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांची केमिस्ट्री सर्वांनाच माहितीये. काही दिवसांपूर्वीच हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा डबल एक्सएल हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) या दिसल्या होत्या. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर काही विशेष धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या.

विशेष म्हणजे डबल एक्सएल या चित्रपटासाठी हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांनी 18 ते 20 किलो वजन वाढवले होते. सुरूवातीला या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. यादरम्यान जान्हवी कपूर हिचा देखील चित्रपट फ्लाॅप गेला होता.

नुकताच हुमा कुरेशी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही धक्कादायक खुलासे करताना हुमा कुरेशी ही दिसली आहे. हुमा कुरेशी म्हणाली की, डबल एक्सएल चित्रपटासाठी मी वजन वाढवले होते. मात्र, त्यानंतर मला काही चित्रपटांमध्ये नाकारले गेले. कारण त्याचे एकच होते ते म्हणजे माझे वाढलेले वजन

पुढे हुमा कुरेशी म्हणाली की, करिअरच्या सुरूवातीला मला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. लोक सतत माझ्या शरीरावर टिका करत होते. सुरूवातीच्या काळात लोक मला सतत वजन कमी करण्याचा सल्ला देत होते. लिपोसक्शन शस्त्रक्रिया करण्यासही अनेकांनी मला सांगितले होते. हुमा पुढे म्हणाली की, एका चित्रपट समीक्षकाने मला थेट म्हटले होते की, हुमा सुंदर चेहऱ्याची अभिनेत्री नक्कीच आहे पण मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी तुला 5 किलो वजन हे कमी करावेच लागणार आहे.

हुमा कुरेशी पुढे म्हणाली की, मला त्या समीक्षकाचे बोलणे ऐकून खूप जास्त दु:ख हे नक्कीच झाले होते. इतकेच नाही तर मी ढसाढसा रडायला देखील लागले होते. या मुलाखतीमध्ये हुमा कुरेशी ही काही गोष्टींवर बिनधास्त बोलताना देखील दिसली आहे. गॅंग्स ऑफ वासेपुर या चित्रपटासाठी आपल्याला फक्त 75 हजार फिस देण्यात आल्याचे देखील हुमा कुरेशी हिने म्हटले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.