AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला पश्चाताप होतोय, सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीने कोर्टात केला अर्ज…

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम शेख याला आता पश्चाताप वाटत आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून त्याने कोर्टात अर्ज केला आहे.

मला पश्चाताप होतोय, सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीने कोर्टात केला अर्ज...
saif ali khan
| Updated on: Aug 28, 2026 | 10:52 PM
Share

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी १६ जानेवारी २०२५ रोजी त्याच्या वांद्रे येथील घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यावेळी चोरट्याशी लढताना सैफ गंभीर जखमी झाला होता. आता या प्रकरणाती अटक आरोपी शरीफुल इस्लाम शेख याने दीड वर्षांनंतर आपल्याला या पश्चाताप होत असून आपण त्यासाठी कोर्टाला विनंती करणार असल्याचे म्हटले आहे.

शरीफुल इस्लाम शेख याने सैफ अली खानच्या घरात घुसून पैसे मागितले होते. त्यानंतर त्याने सैफच्या मुलगा झोपलेल्या त्या रुमच्या दिशेने धाव घेतली होती. मात्र, सैफने त्याच्याशी दोन हात केल्याने त्याने सैफवर वार करुन तो मागच्या फायर एक्झिटच्या जिन्यांनी पसार झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होत.आता शरीफुल यांनी कोर्टात अर्ज करीत आपल्याला घडलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असून गुन्हा कबूल करीत आहे. आपल्या कमीत कमी शिक्षा व्हावी अशी मागणी त्याने कोर्टाला केली आहे. यावर पुढील सुनावणी आता ११ सप्टेंबर रोजी आहे.

सैफवर झाला होता चाकू हल्ला

शरीफुल यांनी सैफ याच्या घरात गेल्या वर्षी १६ जानेवारी २०२५ रोजी आरोपी शरीफुल याने शिरकाव केला होता. त्याने सैफ आणि करीना यांच्याकडे पैसे मागितले होते. त्यांनी नकार देताच तो सैफच्या मुलाच्या बेडरुमच्या दिशेने गेला तेव्हा सैफने त्याला अडवले. तेव्हा सैफच्या मानेवर त्याने चाकू हल्ला केला. आणि तो इमारतीच्या फायर एक्झिटने पसार झाला.त्यानंतर त्याचा चेहरा सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्याला पोलिसांनी शोधून काढले. चाकू लागल्याने सैफ रिक्षाने लिलावती रुग्णालयात पोहचला होता. त्यावेळी त्याच्या सोबत त्याची दोन मुले होती. तर करिना कपूर तिच्या नातेवाईकांकडे गेली होती.

सैफचा वर्कफ्रंट

सैफ अली खान अलिकडे ‘कर्तव्य’ या सिरिजमध्ये दिसला होता. ही सिरीज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाली होती. त्यातील सैफच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. सैफचा आगामी चित्रपट ‘हैवान’ लवकरच रिलीज होणार असून त्यात तो बऱ्याच वर्षांनंतर अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. या चित्रपट येत्या ११ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Follow Us