AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देश सोडून जा, निर्देश मिळताच इम्रान खाननं उचललं मोठं पाऊल, आता थेट….सिस्टीमविरोधात दंड थोपटले!

बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस बजावल्याची सध्या बातमी समोर येत आहे. त्याने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

देश सोडून जा, निर्देश मिळताच इम्रान खाननं उचललं मोठं पाऊल, आता थेट....सिस्टीमविरोधात दंड थोपटले!
| Updated on: Oct 15, 2026 | 3:36 PM
Share

बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (FRRO) देण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या नोटिशीला आव्हान देण्यासाठी अभिनेता इम्रान खान मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

आंदोलनात सहभागी झाल्याने कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अभिनेता इम्रान खानला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अभिनेता इम्रान खान हा अमेरिकन नागरिक असल्याचा दावा करत, राजकीय आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

FRRO कडून हद्दपारीची नोटीस

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान हा ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डधारक असल्याचे सांगितले जात आहे. OCI कार्डधारकांना राजकीय आंदोलनात सहभागी होण्यासंदर्भात लागू असलेल्या नियमांचा आधार घेत FRRO ने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, 2025 अंतर्गत इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस बजावल्याची बातमी आहे. या नोटिशीनुसार, त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

FRRO च्या या निर्णयाला इम्रान खान न्यायालयात आव्हान देणार आहेत. MZM लीगलच्या वतीने ॲड. झुल्फिकार मेमन, ॲड. परवेझ मेमन आणि ॲड. चिराग नाईक त्याची बाजू मांडणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश महेशचंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आता मुंबई उच्च न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते आणि इम्रान खान याला दिलेल्या नोटिशीबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इम्रान खान हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अभिनेता गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून देखील दूर आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...