Ind vs Pak : बाबर आझमच्या विकेटनंतर अरिजीत सिंहचं ‘गांगुली स्टाइल’ सेलिब्रेशन

भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना म्हटलं की क्रिकेटप्रेमींचा उत्साह हा अनोखा असतो. हा उत्साह केवळ सर्वसामान्यांमध्येच नाही तर सेलिब्रिटींमध्ये पहायला मिळतो. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचदरम्यान जेव्हा बाबर आझमची विकेट गेली, तेव्हा गायक अरिजीत सिंहचा उत्साह वेगळाच होता.

Ind vs Pak : बाबर आझमच्या विकेटनंतर अरिजीत सिंहचं 'गांगुली स्टाइल' सेलिब्रेशन
Babar Azam and Arijit SinghImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 8:16 PM

अहमदाबाद | 14 ऑक्टोबर 2023 : अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान ‘क्रिकेट वर्ल्ड कप 2023’चा सामना खेळला गेला. हा सामना कोण जिंकणार, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून होतं. पाकिस्ताननंतर टीम इंडियाची बॅटिंग सुरू असतानाच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहचा आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमचा खेळाडू बाबर आझमच्या विकेटनंतर अरिजीत जल्लोष करताना दिसत आहे. यावेळी त्याचं गांगुली स्टाइल सेलिब्रेशन पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे. अरिजीतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

भारत विरोधातील पाकिस्तानचा हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये खेळला गेला. हा सामना सुरू होण्याआधी स्टेडियममध्ये बॉलिवूडच्या चार प्रसिद्ध गायकांनी आपल्या दमदार आवाजाने माहौल निर्मिती केली. अरिजीत सिंह, सुनिधी चौहान, सुखविंदर सिंह आणि शंकर महादेवन यांनी एकापेक्षा एक गाणी सादर केली. अरिजीतच्या गाण्यांवर क्रिकेटप्रेमी स्टेडियमवरच थिरकले. मॅचच्या आधी लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर अरिजीतने स्टँडवर बसून मॅच पाहण्याचा आनंद घेतला. या दरम्यानचा त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये अरिजीत टी-शर्ट घेऊन गांगुली स्टाइलमध्ये जल्लोष करताना दिसत आहे. गांगुलीला अशाच पद्धतीने टी-शर्ट फिरवताना 2002 मध्ये पाहिलं गेलं होतं. त्यावेळी भारत विरोधात इंग्लंडचा सामना सुरू होता. गांगुलीची ही सेलिब्रेशन स्टाइल आजसुद्धा लोकप्रिय आहे. त्यामुळेच अरिजीतचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

‘अरिजीत सिंहचा असा अंदाज याआधी कधीच पहायला मिळाल नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘अरिजीत हासुद्धा आपल्याप्रमाणेच सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. त्याचा हा व्हिडीओ पाहून भारतीय क्रिकेटप्रेमी खुश झाले आहेत. दरम्यान टीम इंडियाच्या बॅटिंगआधी पाकिस्तानने बॅटिंग केली. पाकिस्तानला टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर 50 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तान 42.5 ओव्हरमध्ये 191 ऑलआऊट झाली. पाकिस्तानकडून कॅप्टन बाबर आझम याने सर्वाधिक 50 धावा केल्या.

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.