Indian Idol 12 | आदित्य नारायणनंतर आता ‘इंडियन आयडॉल’ स्पर्धक पवनदीपला कोरोनाची लागण!

एखाद्या कार्यक्रमात स्पर्धकाला कोरोनाची लागण होण्याचे हे पहिलेच प्रकरण समोर आले आहे. यानंतर आता हा कार्यक्रम सुरु ठेवायचा की अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकायचा याचा विचार कार्यक्रमाचे मेकर्स आणि वाहिनीशी संबंधित लोक करत आहेत.

Indian Idol 12 | आदित्य नारायणनंतर आता ‘इंडियन आयडॉल’ स्पर्धक पवनदीपला कोरोनाची लागण!
पवनदीप राजन

मुंबई : कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. मालिकांच्या सेटवरही कोरोनाने शिरकाव केला आहे. माधुरी दीक्षितच्या ‘डान्स दिवाने’ (Dance Deewane) या कार्यक्रमाच्या मंचावर तब्बल 18 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर ‘इंडियन आयडॉल 12’चा (Indian ido 12) होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) याला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या जागी सध्या दुसरा अभिनेता या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत होता. खबरदारी म्हणून इथल्या स्पर्धकांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात स्पर्धक पवनदीप (Pawandeep Rajan) याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे (Indian Idol 12 contestant Pawandeep Rajan Tested corona positive).

एखाद्या कार्यक्रमात स्पर्धकाला कोरोनाची लागण होण्याचे हे पहिलेच प्रकरण समोर आले आहे. यानंतर आता हा कार्यक्रम सुरु ठेवायचा की अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकायचा याचा विचार कार्यक्रमाचे मेकर्स आणि वाहिनीशी संबंधित लोक करत आहेत.

पवनदीपला कोरोना झाल्यावर त्याच्याबरोबर राहणारे सर्व स्पर्धक क्वारंटाईन होतील की, शूटिंग सुरू राहील? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. स्पर्धकांव्यतिरिक्त इंडियन आयडॉलचे परीक्षक हिमेश रेशमिया, नेहा कक्कर आणि विशाल दादलानी यांचीही दररोज कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. शोमध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांनाही सेफ्टी प्रोटोकॉलमधून जावे लागते. गेल्या आठवड्यात या कार्यक्रमात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणारी रेखा पाहुणी परीक्षक म्हणून दिसली होती.

मनोरंजन उद्योगात कोरोनाचा शिरकाव

तथापि, चॅनलकडून यावर कोणतेही अधिकृत पुष्टीकरण झालेले नाही, किंवा कोणतेही विधान दिले गेले नाही. पण इंडियन आयडॉलच्या आधी ‘डान्स दिवाने’च्या सेटवर देखील तीन स्पर्धकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत आणि करमणूक उद्योग देखील या साथीच्या प्रादुर्भावापासून वाचू शकलेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये अक्षय कुमार, आलिया भट्ट, रुपा गांगुली, सीमा पहावा, विक्की कौशल, भूमि पेडणेकर आणि कतरिना कैफ यासारख्या अनेक सेलेब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे (Indian Idol 12 contestant Pawandeep Rajan Tested corona positive).

माधुरीच्या कार्यक्रमात कोरोणाचा विस्फोट

एकीकडे कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी जोरदार लसीकरण मोहीम सुरू असताना, दुसरीकडे कोरोना (Corona Virus) रुग्णांची वाढती संख्या थांबता थांबतच नाहीय. कोरोनामुळे एका प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर प्रचंड मोठा हाहाकार माजला आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) परीक्षकाची भूमिका पार पाडत असलेल्या ‘डान्स दिवाने’ (Dance deewane) या शोच्या सीझन 3मध्ये  तब्बल 18 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कारणामुळे सध्या सेटवरील सर्व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितसह डान्सर धर्मेश येलांडे (Dharmesh Yelande) आणि तुषार कालिया (Tushar kalia) हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. तथापि, या सर्वातून ब्रेक घेत माधुरी थेट मालदीवला रवाना झाली आहे.

(Indian Idol 12 contestant Pawandeep Rajan Tested corona positive)

हेही वाचा :

PHOTO | मुंबई विमातळावरही दिसला जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज, स्टायलिश लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

VIDEO | हात पकडून अनुष्काने विराटला उचललं, कोहलीच्या तोंडून पटकन निघालं…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI