PHOTO | मुंबई विमातळावरही दिसला जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज, स्टायलिश लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor ) बहिणी खुशीबरोबर एलएमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. आता ती मुंबईत परतली आहे. या दरम्यान मुंबई विमानतळावरही जान्हवीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:18 PM, 7 Apr 2021
1/5
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor ) बहिणी खुशीबरोबर एलएमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. आता ती मुंबईत परतली आहे. या दरम्यान मुंबई विमानतळावरही जान्हवीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. पांढऱ्या प्रिंटेड जंपसूटमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. यासह तिने राखाडी श्रग परिधान केला आहे.
2/5
कोरोना साथीच्या काळात जान्हवी कपूर स्वतःची खूप काळजी घेत आहे. यावेळी तिने ड्रेसला मॅचिंग पांढऱ्या रंगाचा मास्क देखील परिधान केला होता. मात्र, अवघ्या काही मिनिटांसाठी मास्क काढून तिने फोटो पोझ देखील दिल्या.
3/5
अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. बहीण खुशीबरोबर धमाल करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या खास सहलीचे फोटो आणि व्हिडीओ देखील जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/5
जान्हवी सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ‘गुडलक जेरी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यंदाचा वाढदिवस देखील तिने चित्रपटाच्या सेटवरच साजरा केला होता.
5/5
नुकताच जान्हवी कपूरचा ‘रुही’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा, जान्हवीसोबत मुख्य भूमिकेत दिसले आहेत.