नचिकेतचं गाणं ऐकून प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध! पुन्हा एकदा Indian Idol 12वर केला हल्लाबोल

‘इंडियन आयडॉल 12’चा स्पर्धक नचिकेत लेले याच्या एलिमीनेशनसाठी प्रेक्षकांनी अद्याप या शोच्या निर्मात्यांना क्षमा केली नाही. आजही सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शोचे चाहते इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर चॅनलला याबाबत ट्रोल करत असतात.

नचिकेतचं गाणं ऐकून प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध! पुन्हा एकदा Indian Idol 12वर केला हल्लाबोल
इंडियन आयडॉल 12
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 10:31 AM

मुंबई : ‘इंडियन आयडॉल 12’चा स्पर्धक नचिकेत लेले (Nachiket Lele) याच्या एलिमीनेशनसाठी प्रेक्षकांनी अद्याप या शोच्या निर्मात्यांना क्षमा केली नाही. आजही सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शोचे चाहते इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर चॅनलला याबाबत ट्रोल करत असतात. निर्मात्यांनी काही स्पर्धकांसोबत पक्षपात केल्याचा आरोप सतत केला जात आहे. नचिकेतने नुकत्याच त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये ‘लाईफ इन मेट्रो’ या चित्रपटाचे ‘ओ मेरी जान’ हे गाणे गायले आहे (Indian Idol 12 troll after contestant Nachiket Lele post an amazing song).

या पोस्टमध्ये नचिकेतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या गाण्याद्वारे तो काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे प्रेक्षक इतके प्रभावित झाले आहेत की, पुन्हा एकदा षण्मुखप्रियाला बाहेरचा रस्ता दाखवून नचिकेतला पुन्हा या शोमध्ये आणण्याची मागणी केली आहे.

पाहा नचिकेतचे गाणे :

षण्मुखप्रियाचे ट्रोलर्सच्या निशाण्यावर

नचिकेत लेले यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणानंतर पुन्हा एकदा ‘इंडियन आयडॉल 12’चे प्रेक्षक षण्मुखप्रियाला ट्रोल करत आहेत. एका चाहत्याने नाचिकेतला ‘कोहिनूर’ आणि षण्मुखप्रियाला ‘तांबे’ म्हणत मेकर्सवर हल्लाबोल केला आहे. तर एका चाहत्याने गाणे गाणारा गायक नचिकेत लेले आणि गाण्याची हत्याची करणारी षण्मुखप्रिया असे म्हटले आहे. खरं तर, किशोर कुमारच्या स्पेशल एपिसोडनंतर सोशल मीडियावर षण्मुखप्रियाला या स्पर्धेतून बेदखल करण्याची मागणी होत आहे. षण्मुखप्रियाने तिच्या आईबरोबर मुलाखत देताना याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असला, तरी चाहते त्याचे म्हणणे समजून घ्यायला तयार नाहीत (Indian Idol 12 troll after contestant Nachiket Lele post an amazing song).

नचिकेत परतण्यास तयार

काही आठवड्यांपूर्वी ‘टीव्ही 9’शी खास बातचीत करताना, जेव्हा नचिकेतला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून शोमध्ये पुन्हा प्रवेश करण्याबद्दल विचारले असता त्याने उत्तर दिले की, ”वाईल्ड कार्ड एंट्रीबद्दल मला अजून काही माहिती नाही. हेदेखील माहित नाही की, या हंगामात वाईल्ड कार्ड एंट्रीची सिस्टम असेल की, नाही आणि मला पुन्हा संधी दिली जाईल की नाही. मला काहीच माहित नाही. पण मला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे, म्हणून जर निर्मात्यांनी मला पुन्हा कॉल केला आणि मला आणखी एक संधी मिळाली, तर मला खरोखरच आनंद वाटेल आणि मी अधिक चांगले सादरीकरण करण्यासाठी खूप मेहनत करेन.”

हेही वाचा :

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळवली वाहवा, इरफान खानचा शेवटचा चित्रपट 4 वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत!

Big News | वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘RRR’, हिंदीच नव्हे जगातील अनेक भाषांमध्ये होणार प्रदर्शित!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.