AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीयांचे लज्जास्पद कृत्य!; पाकिस्तानी अभिनेत्रीचे इन्स्टा बॅन झाले म्हणून VPN वापरुन चाहत्यांच्या कमेंट

पाकिस्तानी कलाकरांचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारतात बॅन करण्यात आले आहेत. पण चाहत्यांनी VPN वापरुन कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.

भारतीयांचे लज्जास्पद कृत्य!; पाकिस्तानी अभिनेत्रीचे इन्स्टा बॅन झाले म्हणून VPN वापरुन चाहत्यांच्या कमेंट
Hania AmirImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 04, 2025 | 6:50 PM
Share

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात सतत कठोर निर्णय घेतले जात आहेत. आता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशींनंतर पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनल्सवर बंदी आणण्यात आली आहे. त्यासोबतच पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंटही बॅन करण्यात आले. पण तरीही काही भारतीय चाहते VPN वापरुन कमेंट्स करताना दिसत आहेत. याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अनेकांनी हे भारतीयांचे लज्जास्पद कृत्य असल्याचे म्हटले आहे.

गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारने गेल्या आठवड्यात 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेनंतर अनेक पाकिस्तानी कलाकरांचे इन्स्टाग्राम अकाऊंट, एक्स अकाऊंट आणि युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे. भारत, भारताचे लष्कर आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कंटेट, खोट्या गोष्टी आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. असे असूनही काही भारतीयांनी पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कमेंट्स करण्यासाठी शक्कल लढवली आहे. वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया

नेटकरी संतापले

टेलीचक्कर या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये भारतीय चाहते पाकिस्तानी अभिनेत्री हानियाच्या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने, ‘किती लज्जास्पद आहे. स्वत:च्या देशापेक्षा तुम्हाला ते कलाकार जास्त महत्त्वाचे आहेत?’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘कृपया या लोकांना पाकिस्तानमध्ये पाठवा’ असे म्हटले आहे.

नेमकं काय केलं?

काही भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट्स करण्यासाठी VPNचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने हानिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टवर कमेंट करत, ‘हानिया तू काळजी करु नकोस. आम्ही VPNचा वापर करुन आले आहोत’ असे म्हटले आहे. त्यावर हानियाने देखील रिप्लाय देते ‘आता मला रडायला येईल’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘हॅलो हानिया, VPNचे सब्स्क्रीपशन केवळ तुझ्यासाठी घेतले आहे. भारताकडू प्रेम’अशी कमेंट केली आहे. त्यावर हानियाने उत्तर देत ‘लव्ह यू’ असे म्हटले आहे.

Follow Us
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?