भारतातील सर्वात महागडा गायक, एका तासासाठी घेतो 3 कोटी
भारतीय चित्रपटसृष्टीत सुंदर आवाजांची कमतरता नाही. अनेक प्रसिद्ध गायक आहेत ज्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. यामध्ये सर्वाधिक शुल्क आकारणारे एक नाव आहे. श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग या गायकांना मागे टाकून तो अव्वल स्थानावर आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांनी 60 च्या दशकात बॉलीवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. जेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये गाण्यासाठी पुरुष गायकांच्या बरोबरीने मानधनाची मागणी केली. लता मंगेशकर यांच्या आवाजाची जादू संपूर्ण भारतात पसरली. लता मंगेशकर यांच्या गाण्यांनी खूप प्रसिद्ध मिळवली. सुरुवातीला त्यांना जास्त मानधन मिळत नव्हते. मोहम्मद रफी आणि मन्ना डे या सारख्या लोकांना प्रत्येक गाण्यासाठी 300 रुपये मिळायचे. पण लतादीदींना बाबतीत गोष्ट वेगळी होती. आता तर अल्बम्स यूट्यूबवर प्रदर्शित करु लागलेत. त्यामुळे कलाकारांनाही व्यासपीठ मिळाले आहे जेथून ते लाखो रुपये कमवू शकतात. भारतातील आज मोठे मोठे गायक प्रत्येक गाण्यासाठी लाखो रुपये आकारतात. पण एक गायक आहे जो इंडस्ट्रीत सर्वात महागडा गायक आहे.
बॉलिवूडमधील सर्वात महागडा गायक दुसरा कोणी नसून ए.आर रहमान आहे. सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा तो गायक आहे. इंडस्ट्रीच्या अंतर्गत माहितीनुसार, एआर रहमान कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी 3 कोटी रुपये आणि गाण्यांसाठी संगीत देण्यासाठी 8 ते 10 कोटी रुपये घेतात. भारतातील कोणत्याही गायकाकडून आकारण्यात येणाऱ्या रकमेपेक्षा ते 12 ते 15 पट जास्त आहे.
सर्वात महागडा गायक कोण आहे?
ए आर रेहमानची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते स्वतःची गाणी स्वतः लिहितात. त्यामुळे रहमान हे नेहमीच स्वतःची गाणी गातात. पण जेव्हा ते दुसऱ्याच्या निर्मितीला आपला आवाज देतात तेव्हा निर्मात्यांना त्यांना प्रीमियम पैसे द्यावे लागतात, म्हणजे थोडे जास्त. अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती 2100 कोटी रुपये आहे. एआर रहमान यांनी एआयच्या मदतीने मृत गायकांच्या आवाजांना देखील जिवंत केले आहे.
श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांची फी किती
दिग्गज गायकांमध्ये श्रेया घोषाल ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी गायिका आहे. ४० वर्षीय श्रेया तिच्या रेकॉर्ड केलेल्या प्रत्येक गाण्यासाठी २५ लाख रुपये आकारते. श्रेयानंतर सुनिधी चौहान तिसऱ्या क्रमांकावर आहे, जी प्रत्येक गाण्यासाठी 18-20 लाख रुपये घेते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरिजित सिंगही तेवढीच रक्कम घेतो.
View this post on Instagram
सोनू निगम टॉप 5 मध्ये आहे
सोनू निगम एका गाण्यासाठी १५-१८ लाख रुपये फी घेतो. तो या यादीत पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय रॅपर बादशाह आणि दिलजीत दोसांझ यांनी देखील गेल्या काही वर्षांत त्यांची फी वाढवली आहे आणि लवकरच ते देखील टॉप 5 मध्ये प्रवेश करू शकतात.
