AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | करीनाने चाहत्यांना दिली वाईट वागणूक; इन्फोसिसच्या नारायण मूर्तींनी सांगितला किस्सा

या व्हिडीओमध्ये नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती या एका कार्यक्रमात लोकांशी संवाद साधत आहेत. यावेळी नारायण मूर्ती हे करीना कपूरची निंदा करतात. सुधा मूर्ती यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते करीनाचा हा संपूर्ण किस्सा आवर्जून सांगतात.

Kareena Kapoor | करीनाने चाहत्यांना दिली वाईट वागणूक; इन्फोसिसच्या नारायण मूर्तींनी सांगितला किस्सा
Narayana Murthy and Kareena KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 25, 2023 | 3:10 PM
Share

मुंबई | 25 जुलै 2023 : इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी अभिनेत्री करीना कपूरविषयीचा एक प्रसंग सांगितला. करीना कपूरने तिच्या चाहत्यांकडे दुर्लक्ष केलं असं ते म्हणाले. एकदा ते ज्या विमानातून प्रवास करत होते, त्याच विमानात करीनासुद्धा प्रवास करत होती. नारायण मूर्ती यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ जुना आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या तो चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती या एका कार्यक्रमात लोकांशी संवाद साधत आहेत. यावेळी नारायण मूर्ती हे करीना कपूरची निंदा करतात. सुधा मूर्ती यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते करीनाचा हा संपूर्ण किस्सा आवर्जून सांगतात.

नारायण मूर्ती यांनी सांगितलं, “एकदा मी लंडनहून परत येत होतो. तेव्हा माझ्या बाजूच्या सीटवर करीना कपूर बसली होती. विमानातील अनेकजण तिच्याजवळ येऊन तिला हॅलो म्हणत होते. मात्र करीना त्यांच्याकडे वळूनही पाहत नव्हती. ती त्यांना कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हती. हे पाहून मी थक्क झालो. माझ्याजवळ जे लोक आले, त्यांच्यासाठी मी उभा राहिलो, त्यांच्याशी मी अर्धा-एक मिनिट बोललो. त्या चाहत्यांची फक्त एवढीच अपेक्षा होती.”

हे ऐकल्यानंतर सुधा मूर्ती म्हणतात की “करीनाचे लाखो चाहते आहेत, त्यामुळे कदाचित ती दमली असेल. मूर्ती एक संस्थापक आहेत, अशा व्यक्तीचे फार फार तर दहा हजार चाहते असतील. मात्र अभिनेता किंवा अभिनेत्रीचे लाखो चाहते असतात.” पत्नीची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर नारायण मूर्ती पुढे म्हणाले, “ही खरी समस्या नाही. मुद्दा हा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती प्रेम दाखवते, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत तेवढ्याच प्रेमाने वागू शकता. तुमची पद्धत वेगळी असू शकते. मात्र हे खूप गरजेचं आहे. हे सर्व तुमचा अहंकार कमी करण्याच्या पद्धती आहेत, बाकी काही नाही.”

दोन महिन्यांपूर्वी करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती एअरपोर्टवर एका चाहतीकडे साफ दुर्लक्ष करताना दिसतेय. करीनाची ही वागणूक पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले होते. ‘हा खूपच उद्धटपणा आहे. तिला फक्त सेल्फी काढायचा होता. पण या बॉलिवूड कलाकारांना एवढा कसला ॲटिट्यूड आहे हे मला कधीच समजलं नाही. ते फक्त चित्रपटात चांगल्या व्यक्तीची भूमिका साकारतात, पण त्यांची रिॲलिटी ही आहे’, असं एकाने लिहिलं होतं. तर ‘अशा लोकांमागे सेल्फीसाठी धावणं हा खूपच मूर्खपणा आहे. ही लोकं खरे हिरो नाहीत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं होतं. ‘सर्वांत उद्धट सेलिब्रिटी’ अशा शब्दांतही नेटकऱ्यांनी करीनाला टोला लगावला होता.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.