धर्मेंद्र – हेमा मालिनी एकाच हॉटेलमध्ये राहायचे आणि…, दोघांच्या नात्याबद्दल मोठं सत्य समोर

Hema Malini - Dharmendra : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे... पण त्यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली... याबद्दल फार कोणाला माहिती नाही...

धर्मेंद्र - हेमा मालिनी एकाच हॉटेलमध्ये राहायचे आणि...,  दोघांच्या नात्याबद्दल मोठं सत्य समोर
धर्मेंद्र - हेमा मालिनी
| Updated on: Nov 17, 2025 | 4:24 PM

Hema Malini – Dharmendra : धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी समाजाच्या विरोधात जात हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. जेव्हा धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालं तेव्हा हेमा मालिनी फक्त 6 वर्षांच्या होत्या. तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यामध्ये 13 वर्षाचं अंतर आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र 1970 पासून एकत्र होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 1980 मध्ये लग्न केलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली देखील आहेत…

सेटवरच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यामध्ये प्रेम बहरलं. दोघांच्या नात्याबद्दल दिग्दर्शक आणि अभिनेते रमेश सिप्पी यांनी मोठं वक्तव्य दिलं होतं. ‘आम्हाला सर्वांना माहिती होतं की, हेमाजी आणि धर्मेंद्रजी यांच्यामध्ये प्रेम होतं… पण त्यांनी कधीच सेटवर त्यांच्या नात्याबद्दल सेटवर दाखवलं नाही. ते सेटवर कायम प्रोफेशनल राहायचे… पण वेग-वेगळे राहायचे…’

‘जुन्या काळातील लोकं खरं वेगळे होते… सेटवर त्यांनी असं कधीच दाखवलं नाही.. दोघे एकाच हॉटेलमध्ये राहातात… रिकाम्या वेळेत धर्मेंद्र त्यांच्या टीमसोबत राहायचे आणि हेमा माहिनी त्यांच्या टीमसोबत असायच्या… सर्व कपल्ससाठी दोघे प्रेरणास्थान आहेत.’

 

 

रेश्मा पठाण यांनी सांगितल्यानुसार, ‘शोले’ सिनेमाने माझं संपूर्ण आयुष्य बदललं आणि हेमा मालिनी यांना ‘द शोले गर्ल’ म्हणून आजही ओळखलं जातं. सांगायचं झालं तर, हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न आहे. समाजाच्या विरोधात जात दोघांनी लग्न केलं. पण धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून हेमा मालिनी यांनी आयुष्यात अनेकदा तडजोड करावी लागली.

धर्मेंद्र यांची प्रकृती

काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला… आता धर्मेंद्र यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरु आहेत. 8 डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा वाढदिवस आहे. तर कुटुंबियांनी त्यांच्या 90 व्या वाढदिवसाची तयारी सुरु केली आहे.