AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Leela Bhansali Inshallah : ‘इंशाअल्लाह’ पुन्हा येणार? आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळींची पुन्हा चर्चा सुरू

आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांचा 'इंशाअल्लाह' चित्रपट पुन्हा चर्चेत आहे. 2019 मध्ये सलमान खानसोबत घोषित होऊन नंतर रद्द झालेल्या या प्रोजेक्टवर आलिया आणि भन्साळी पुन्हा काम सुरू करण्याच्या विचारात आहेत. स्क्रिप्टमध्ये मोठे बदल अपेक्षित असून, पुरुष कलाकाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 'लव्ह अँड वॉर' नंतर 'इंशाअल्लाह'ला नवा रंग दिला जाण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

Sanjay Leela Bhansali Inshallah : ‘इंशाअल्लाह’ पुन्हा येणार? आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळींची पुन्हा चर्चा सुरू
| Updated on: Oct 05, 2026 | 6:00 PM
Share

संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 2019 मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी आलिया भट्ट आणि सलमान खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सलमान खान आणि भन्साळी यांच्यातील क्रिएटिव्ह मतभेदांमुळे हा प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नाही आणि अखेर चित्रपटाचे काम थांबवण्यात आलं. हा चित्रपट बंद होण्याचा आलियावरही मोठा परिणाम झाला होता. शूटिंगदरम्यान आलियाला ‘इंशाअल्लाह’ बंद होणार असल्याचे समजले आणि त्यावेळी ती खूप रडली होती, असं एका मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांनी सांगितलं होतं.

मात्र, आता या चित्रपटाबाबत एक नवी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांनी ‘इंशाअल्लाह’ पुन्हा पुढे नेण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. सध्या आलिया भट्ट भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या आगामी चित्रपटात काम करत आहे. ‘मिड डे’च्या रिपोर्टनुसार, ‘लव्ह अँड वॉर’चे काम पूर्ण झाल्यानंतर आलिया आणि भन्साळी ‘इंशाअल्लाह’वर पुन्हा काम सुरू करू शकते.

रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलं आहे की, अनेक वर्षांपूर्वी ज्या स्वरूपात ‘इंशाअल्लाह’ची घोषणा करण्यात आली होती, त्याच स्वरूपात हा चित्रपट आता पुढे नेला जाणार नाही. चित्रपटाची मूळ कथा कायम ठेवली जाऊ शकते, मात्र स्क्रिप्ट आणि इतर मटेरियलवर मोठ्या प्रमाणात पुन्हा काम केले जाण्याची शक्यता आहे. तसेच, ही कथा प्रेक्षकांसमोर एका नव्या आणि फ्रेश पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

कास्टिंगबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही

‘इंशाअल्लाह’बाबत गेल्या काही वर्षांत अनेक वेगवेगळ्या चर्चा समोर आल्या आहेत. सलमान खान या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी शाहरुख खानची वर्णी लागू शकते, अशा चर्चांनाही काही काळ जोर आला होता. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आता समोर आलेल्या माहितीनुसार, भन्साळी यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्णपणे निश्चित होईपर्यंत कास्टिंगबाबत कोणताही अंतिम निर्णय न घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आलियासोबत मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार, याबाबत सध्या काहीही निश्चित मानले जात नाही.

सलमान, शाहरुख की एखादा नवा अभिनेता?

सूत्रांच्या माहितीनुसार, भन्साळी यांच्या चित्रपटात स्क्रिप्ट अंतिम होण्यापूर्वी कलाकारांची कास्टिंग निश्चित केली जाणार नाही. सलमान खान सध्या राज आणि डीके यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे, शाहरुख खानने ‘किंग’नंतर कोणता प्रोजेक्ट निवडला आहे, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही.

त्यामुळे ‘इंशाअल्लाह’मध्ये आलिया भट्टच्या सोबतीला सलमान खान, शाहरुख खान किंवा एखादा नवा आणि तरुण अभिनेता दिसणार का, हा प्रश्न सध्या कायम आहे. कथेसाठी योग्य वाटल्यास भन्साळी एखाद्या तरुण अभिनेत्याची निवड करू शकतात, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मात्र, या सर्व चर्चा आणि रिपोर्ट्सदरम्यान एक गोष्ट महत्त्वाची आहे—संजय लीला भन्साळी किंवा आलिया भट्ट यांनी अद्याप ‘इंशाअल्लाह’ पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे चित्रपट खरोखरच पुन्हा फ्लोअरवर जाणार का आणि त्यात आलियासोबत कोणता अभिनेता दिसणार, यासाठी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Follow Us
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी