Income Tax Raid | अबब! 350 कोटींची गडबड, इन्कमटॅक्स धाडीत काय काय सापडलं?

घर आणि ऑफिसेस मिळून तब्बल 28 ठिकाणी छापे टाकले गेले. सर्च ऑपरेशन दरम्यान इनकम आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. | IT Raids Bollywood celebrities

Income Tax Raid | अबब! 350 कोटींची गडबड, इन्कमटॅक्स धाडीत काय काय सापडलं?
तापसी आणि अनुराग

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu), चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि विकास बहल (Vikas Bahal) यांच्या घरावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत इन्कमटॅक्स विभागाची छापेमारी सुरु होती. इनकम टॅक्स विभागाच्या म्हणण्यानुसार 2 लीडिंग फिल्म प्रोडक्शन कंपनी, एक लीडिंग अभिनेत्री (तापसी पन्नू) तसंच दोन मॅनेजमेंट कंपनीवर छापे टाकण्यात आले आहेत. (IT Raids on Bollywood celebrities actor taapsee pannu and film director anurag kashyap).

सर्च ऑपरेशन मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथे केलं गेलं. घर आणि ऑफिसेस मिळून तब्बल 28 ठिकाणी छापे टाकले गेले. सर्च ऑपरेशन दरम्यान इनकम आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. इनकम टॅक्स विभागाला 350 कोटी रुपयांची टॅक्स चोरीची शंका आहे.

तापसी पन्नूच्या नावावर 5 कोटी रुपयांची रिसिट रिकव्हर झाली. ज्याची तपासणी सुरु आहे. याशिवाय 20 कोटींच्या टॅक्सचोरीसंबंधी पुरावे मिळाले आहेत. असेच पुरावे तापसीविरोधातही मिळाल्याची माहिती समजत आहे. दोन टॅलेंट कंपन्या (फैंटम आणि क्वान) यांच्याकडून मोठ्या रकमेचा डिजीटल डेटा व्हॉट्सअॅप, इमेल हार्ड डिस्कसह जप्त केले आहे. सर्च ऑपरेशन आणि चौकशी अजूनही सुरुच आहे.

विकास बहल अनुरागचा पार्टनर होता!

अभिनेता विकास बहल देखील पूर्वी अनुराग कश्यपच्या कंपनीचा एक भाग होता. नंतर अनुरागने त्याला या कंपनीतून दूर केले. एका मॉडेलने # मीटूमध्ये विकास बहलवरही आरोप केले होते. त्यानंतर अनुराग कश्यप यांनी विकासला त्याच्या प्रोडक्शन हाऊस ‘फॅंटम फिल्म्स’मधून काढून टाकले होते. या कलाकारांनी मोठी टॅक्स चोरी केल्याचे बोलले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या सेलिब्रिटींवर आयकर विभागाने छापा टाकण्याची आणखी काही कारणेही सांगितली जात आहेत. निर्माता मधु मंटेनाबद्दल असे म्हटले जाते की, त्यांचे शेवटचे पाचही चित्रपट फ्लॉप होते, असे असूनही त्यांनी 500 कोटींचा ‘रामायण’ आणि 200 कोटींचा ‘द्रौपदी’ हे चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती (IT Raids on Bollywood celebrities actor taapsee pannu and film director anurag kashyap continues second day).

अशा परिस्थितीत त्याच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा व मिळकत आयकर अधिकाऱ्यांच्या नजरेत होती. विकास बहल हे मधु मंटेनाबरोबर अनेक फ्लॉप चित्रपटांचे सह-निर्माता देखील होते, परंतु त्यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात बनलेल्या ‘सुपर थर्टी’ने 147 कोटी कमावले होते.

तापसी जवळील अनेक चित्रपट

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हीच्याकडे सध्या चित्रपटांची रंग आहे. ती लवकरच ‘लूट लपेटा’मध्ये दिसणार आहे. तापसीने ‘लूट लपेटा’मधील आपला पहिला लूक शेअर केला आहे. तिच्या या पात्राचे नाव ‘सावी’ आहे. यापूर्वी अनुराग कश्यप समवेत अभिनेत्री तापसी पन्नूने ‘मनमर्जिया’ नावाचा चित्रपट केला आहे. ती या काळात टाईम ट्रॅव्हलवर आधारित दुसर्‍या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. याशिवाय ती मिताली राजचा बयोपिक देखील करत आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे मोठे विधान!

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि इतर लोकांवर पडलेल्या आयकर धाडीसंदर्भात बोलताना सांगितले की, हे छापे त्याच लोकांवर टाकले जात आहेत. ज्यांना केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न पडत होते. जे लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच लोकांवर निवडकपणे हे छापे टाकले जात आहे. कर चुकवणे ही केवळ एक सबब आहे.

(IT Raids on Bollywood celebrities actor taapsee pannu and film director anurag kashyap)

हे ही वाचा :

Income Tax Raid | इन्कमटॅक्सची धाड दुसऱ्या दिवशीही सुरूच! तापसी-अनुरागवर आता ‘ED’ची टांगती तलवार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI