प्रत्येक ठिकाणी हातात स्पायडर प्लांट घेऊन का फिरतात जॅकी श्रॉफ? मजेशीर आहे कहाणी

जॅकी श्रॉफ हे गळ्यातही अशाच पद्धतीच्या कुंडी आणि रोपट्याचं पेंडंट असलेली माळ घालायचे. गळ्यात एक दोरा आणि त्या दोऱ्याला छोटीशी कुंडी आणि त्यात स्पायडर प्लांट पहायला मिळायचं.

प्रत्येक ठिकाणी हातात स्पायडर प्लांट घेऊन का फिरतात जॅकी श्रॉफ? मजेशीर आहे कहाणी
Jackie ShroffImage Credit source: Viral Bhayani
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 7:45 PM

मुंबई: निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीला ऐश्वर्या राय, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, कार्तिक आर्यन, सलमान खान, जॅकी श्रॉफ यांसारखे कलाकार उपस्थित होते. मात्र या पाहुण्यांपैकी जॅकी श्रॉफ यांच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. यावेळी त्यांच्या हातात एक रोपटं होतं. जॅकी श्रॉफ यांच्या हातात हे रोपटं का आहे, त्यांनी सुभाष घई यांना ते रोपटं भेट म्हणून दिलं का असे प्रश्न नेटकरी विचारू लागले. विशेष म्हणजे त्यांना याआधीही अशा प्रकारच्या रोपट्यांसह पाहिलं गेलं आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नातीच्या पार्टीतही ते अशाच पद्धतीचं रोपटं घेऊन पोहोचले होते. जॅकी श्रॉफ आणि त्यांच्या या रोपट्यामागची कहाणी खूपच रंजक आहे.

जॅकी श्रॉफ हे गळ्यातही अशाच पद्धतीच्या कुंडी आणि रोपट्याचं पेंडंट असलेली माळ घालायचे. गळ्यात एक दोरा आणि त्या दोऱ्याला छोटीशी कुंडी आणि त्यात स्पायडर प्लांट पहायला मिळायचं. त्यांच्या या माळेनं नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. अनेक बॉलिवूड कलाकार हे स्टायलिश दागिने परिधान करताना दिसतात. मात्र जॅकी श्रॉफ यांची स्टाइल वेगळीच आहे.

हे सुद्धा वाचा

जॅकी यांना स्पायडर प्लांटवर विशेष प्रेम आहे. म्हणूनच ते केवळ गळ्यात त्याची माळच घालत नाहीत तर त्यांच्या कारमध्येही तशाच पद्धतीची कुंडी आणि रोपटं पहायला मिळतं. पर्यावरणाची सुरक्षा आणि प्रदूषणाला कमी करण्यासाठी वृक्षारोपण करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं ते मानतात.

याविषयी ते एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाले होते. “वृक्षारोपण करून मी या जगावर उपकार केले नाहीत. आपल्या मुलांच्याही मुलांचा विचार केला पाहिजे की नाही? माझा टायगर बाबा आहे, त्याचा एक छोटा टायगर येईल. तुमच्याही घरात चिमुकले पाहुणे येतील. त्यांच्यासाठी तरी हे करावं”, असं ते म्हणाले होते.

जॅकी यांना जेव्हा स्पायडर प्लांटविषयी विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले, “हे खूपच अनोखं रोपटं आहे. हवेतून बेंझीन हटवण्याचं काम हे रोपटं करतं. त्याबदल्यात तुम्हाला ते ऑक्सिजन देतं. तुम्ही कार किंवा घरातसुद्धा हे रोपटं लावू शकता. महागड्या मुर्त्या किंवा आर्ट पीसपेक्षाही हे मौल्यवान आहे.”

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.