भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेता; पण कमाईच्याबाबतीत सलमान अन् रजनीकांतलाही मागे टाकतो
असा एक अभिनेता जो भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो साउथपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वच चित्रपटांमुळे प्रसिद्ध झाला. त्याने अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एवढंच नाही तर त्याने कमाईच्या बाबतीत तर सलमान, प्रभासलाही मागे टाकलं आहे.कोण आहे हा अभिनेता माहितीये?

भारतातील किंवा बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सबद्दल बोललो तर शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, अमिताभ बच्चन, प्रभास आणि कमल हासन अशी अनेक नावे समोर येतात. पण तुम्हाला असाही एक अभिनेता आहे जो देशातील सर्वात तरुण आणि लहान उंचीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याची उंची 4 फूट 8 इंच आहे. ज्याने मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. पण त्याने कमाईच्याबाबतीत सलमान,प्रभासलाही मागे टाकलं आहे.
दक्षिणेतच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाला हा अभिनेता
जाफर सादिक एकेकाळी डान्सर होता. मग तो अभिनय क्षेत्राकडे वळाला आणि आता तो एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो 29 वर्षांचा आहे. तो गेल्या 5 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. जाफर सादिकने 2020 मध्ये ‘पावा कढाईगल’ या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तो कमल हासन आणि विजय सेतुपती यांच्या ‘विक्रम’ चित्रपटात दिसला. या चित्रपटानंतर तो केवळ दक्षिणेतच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाला. जाफर सादिक हा ‘विक्रम’ चित्रपटातील विजय सेतुपतीच्या गँगचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ‘विक्रम’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि जाफर सादिकची कारकीर्दही वेगाने पुढे गेली. जफरने रजनीकांतच्या ‘जेलर’ चित्रपटातही काम केले आहे.
View this post on Instagram
अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्ससोबत काम केलं अन्…
त्यानंतर जफर सादिकने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तो शेवटचा ‘बेबी जॉन’ मध्ये दिसला होता.यानंतर, एकामागून एक त्याने अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये छोट्या पण शक्तिशाली भूमिका साकारल्या ज्यांनी इतिहास रचला.त्यामुळे त्याची प्रसिद्धी आणि चर्चा जरा जास्तच होऊ लागली आहे.
चित्रपटांनी 2200 कोटींची कमाई केली
जाफर सादिकच्या कारकिर्दीतील चित्रपटांच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, ‘विक्रम’ ने 414 कोटी रुपये, ‘जेलर’ ने 605 कोटी रुपये आणि ‘जवान’ ने 1150 कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे, 5 वर्षांत त्याच्या चित्रपटांनी एकूण 2200 कोटी रुपये कमावले. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही सुपरस्टारचे कलेक्शन इतके जास्त झालेले नाही. ना प्रभास, ना सलमान खान, ना रजनीकांत आणि रणबीर कपूर यांच्याही चित्रपटांचे कलेक्शन झालं नसेल. फक्त शाहरुख खान हा एकमेव स्टार आहे ज्याच्या तीन चित्रपटांनी 2600 कोटी कमावले होते.
