Janmashtami 2023 : ‘जय श्री कृष्णा’ मालिकेतील ‘हा’ खोडकर कृष्णा आता आहे तरी कुठे?

Janmashtami 2023 : ‘जय श्री कृष्णा’ मालिकेतील कृष्ण प्रत्येकाला आवडला होता; कृष्णाची भूमिका साकारणार 'ती' आता आहे तरी कुठे?

Janmashtami 2023 : ‘जय श्री कृष्णा’ मालिकेतील हा खोडकर कृष्णा आता आहे तरी कुठे?
| Updated on: Sep 07, 2023 | 8:51 AM

मुंबई : 7 सप्टेंबर 2023 | कृष्णाचा खोडकरपणा, गोपिकांमध्ये कृष्णाबद्दल असलेलं प्रेम, राधा – कृष्ण यांची कथा अनेकदा छोट्या पडद्याच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आली. पण ‘जय श्री कृष्णा’ मालिकेतील चिमुकल्या कृष्णाला आजही चाहते विसरू शकलेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे ‘जय श्री कृष्णा’ मालिकेत कृष्णाची भूमिकारी धृती भाटिया आता काय करते, ती कुठे आहे? असे अनेक प्रश्न चाहते विचारत अशात. धृती भाटिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर धृती भाटिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

‘जय श्री कृष्ण’ मालिकेला आज अनेक वर्ष उलटली आहेत, पण आजही चिमुकल्या कृष्णाला चाहते विसरु शकलेले नाहीत. धृती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर धृतीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. धृती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

 

 

जेव्हा धृतीने वयाच्या दुसऱ्या वर्षी ‘जय श्री कृष्णा’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा तिने चाहत्यांच भरभरुन मनोरंजन केलं. चाहत्यांना देखील ‘जय श्री कृष्णा’ मधील धृतीचा अभिनय प्रचंड आवडलं.. अनेक सेलिब्रिटींनी देखील धृती हिचं कौतुक केलं. आजही धृतीचे कृष्णाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात..

 

आज दहीहंडी असल्यामुळे ‘जय श्री कृष्ण’ मालिकेतील कृष्ण म्हणजे धृती चर्चेत आली आहे. पण आता धृतीला ओळखणं देखील कठीण आहे. सध्या धृतीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

२००८ साली प्रासारित झालेल्या ‘जय श्री कृष्णा’ मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस आली. तेव्हा आपल्या खोडकर कृतीने धृतीने लहाण मुलांपासून वृद्धांना देखील स्वतःच्या प्रेमात पाडलं. सध्या सर्वत्र धृती हिच्या फोटो आणि व्हिडीओंची चर्चा रंगली आहे.