AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : होलाष्टकच्या पूर्वी करा या गोष्टी, वास्तुदोष होईल दूर, घरात येईल सुख समृद्धी

यावर्षी 24 फेब्रुवारीपासून होलाष्टकाला सुरुवात होत आहे, हिंदू धर्मशास्त्रामध्ये होलाष्टकाला अशुभ माण्यात आलं आहे. होलाष्टकाच्या काळात नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात वाढतो असं मानलं जातं, होलाष्टकाचा प्रभाव कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

Vastu Shastra : होलाष्टकच्या पूर्वी करा या गोष्टी, वास्तुदोष होईल दूर, घरात येईल सुख समृद्धी
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 22, 2026 | 9:51 PM
Share

हिंदू धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून होलाष्टक महत्त्वाचं मानलं जातं. कारण हा काळ अशुभ मानला जातो.अशा या होलाष्टकाची सुरुवात होळीच्या आठ दिवस आधी होते. या होळीपर्यंतच्या आठ दिवसांनाच होलाष्टक असं म्हणतात. हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की, या काळात नकारात्मक शक्तिंचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे या आठ दिवसांच्या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. वास्तुशास्त्रामध्ये देखील होलाष्टक महत्त्वाचं मानलं गेलं आहे, कारण या काळात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते. होलाष्टकाचा प्रभाव कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. या उपायांमुळे नकारात्मक शक्तीची ऊर्जा कमी होईल, तसेच तुमच्या घरात सुख समृद्धी येईल, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

या वर्षी होलाष्टकाची सुरुवात 24 फेब्रुवारी 2026 पासून होणार आहे. तर हे होलाष्टक होळीच्या दुसऱ्या दिवळी 3 मार्च रोजी संपणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार होलाष्टकाची कथा ही हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांच्याशी जोडली गेली आहे. असं मानलं जातं की, होलाष्टकाच्या काळात ग्रहांची स्थिती चांगली नसते, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे या काळात सतर्क आणि सावधान असलं पाहिजे, या काळात देवाची नित्यनियमाने पूजा, प्रार्थन केल्यास तसेच दान -धर्म केल्यास होलाष्टकाचा प्रभाव कमी होतो, असं मानलं जातं. होलाष्टक सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी कराव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात.

घरातील तुटलेल्या, फुटलेल्या वस्तू बाहेर काढा – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात काही तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू असतील काही बंद आणि वापरात नसलेल्या वस्तू असतील तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. नकारात्मक शक्ती वाढते, होलाष्टकाच्या काळात तर ही नकारात्मक ऊर्जा दुप्पट होते. त्यामुळे जर तुमच्या घरात अशा वस्तू असतील तर त्या होलाष्टक लागण्यापूर्वीच बाहेर काढा असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

घरातील अपूर्ण कामे – जर तुमच्या घरात काही अपूर्ण कामे असतील जसं की घराची दुरूस्ती असेल किंवा घराला रंग द्यायचा असेल तर या गोष्टी देखील होलाष्टकाच्या आधीच करून घ्या, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा