AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉवर नसलं, नेटवर्क नसलं तरी नो प्रॉब्लेम, कुठंही लागणार फोन, BSNL च्या या फोनची किंमत..

बीएसएनएलने एक नवीन सॅटेलाइट फोन लाँच केला आहे. चला जाणून घेऊयात की या फोनमध्ये काय विशेष आहे, त्याची किंमत किती आहे आणि तो कोण वापरू शकतात?

टॉवर नसलं, नेटवर्क नसलं तरी नो प्रॉब्लेम, कुठंही लागणार फोन, BSNL च्या या फोनची किंमत..
बीएसएनएल फोनImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 17, 2026 | 10:02 AM
Share

भारतात रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. आपल्या भारतातील सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी बीएसएनएलने एक नवीन सॅटेलाइट फोन लाँच केला आहे. मात्र लाँच करण्यात आलेला हा सॅटेलाइट फोन व्यावसायिक वापरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला आहे. मात्र तुमच्याकडे हा फोन खरेदी करण्याची परवानगी असेल तरच तुम्ही खरेदी करू शकता. दूरसंचार विभागाने (DoT) स्पष्टपणे सांगितले आहे की, वापरकर्ते किंवा संस्था केवळ परवानगी मिळाल्यानंतरच या सॅटेलाइट फोनचा वापर करू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फायदे जाणून घेऊयात.

सॅटेलाइट फोन कशाप्रकारे फायदेशीर ठरेल?

तुम्ही प्रवासात असताना अगदी जिथे टेरेस्ट्रियल नेटवर्क्स नाहीत अशा भागांमध्येही कम्युनिकेशन नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकता. तुम्ही कुठेही व्हॉईस कॉल करू शकता आणि गरज पडल्यास आपत्कालीन मदत मिळवू शकता. बीएसएनएल सॅटेलाइट फोन वापरल्याने वापरकर्त्यांना बॅटरीचा जास्त काळ टिकणारा बॅकअपही मिळतो. सॅटेलाइट नेटवर्क्स अशा भागांपर्यंत पोहोचू शकतात जिथे मोबाईल नेटवर्क्स पोहोचू शकत नाहीत.

बीएसएनएल सॅटेलाइट फोनची किंमत

सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीचा हा सॅटेलाइट फोन 1 लाख 34 हजार 166 रूपयांच्या (टॅक्ससहित) किमतीत लाँच करण्यात आला आहे. किमतीच्या बाबतीत हा फोन ॲपल आयफोन 17, आयफोन 17 प्रो आणि सॅमसंगच्या नवीनतम गॅलेक्सी एस26 अल्ट्रापेक्षा अधिक महाग आहे.

या सॅटेलाइट फोनबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बीएसएनएल कार्यालयाला भेट देऊ शकता किंवा 9768866652 या क्रमांकावर कॉल करू शकता. बीएसएनएलने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा फोन संरक्षण, सागरी कारवाया, आपत्ती निवारण, खाणकाम, दुर्गम भाग, यात्रेकरू आणि ॲडव्हेंचर करत असलेल्या प्रवासासाठी आदर्श आहे.

बीएसएनएलचा हा सॅटेलाइट फोन मजबूत आणि टिकाऊ आहे. मात्र तुम्ही हा सॅटेलाइट फोन शोधत असाल, तर तो तुम्हाला भारतात कुठेच सहजासहजी मिळणार नाही. कारण भारत सरकार कोणालाही सॅटेलाइट फोन सहजपणे वापरण्याची परवानगी देत ​​नाही. बीएसएनएलने अंदाजे 99 हजार साइट्स लाँच केल्या असून, वापरकर्त्यांना 4जी सेवा देण्यासाठी ते आधीच कार्यरत आहे.

Follow Us
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?