‘जय श्री कृष्णा’ मालिकेतील चिमुकला कृष्णा तुम्हाला आठवतो? ‘हा’ व्हिडीओ पाहून व्हाल हैराण
'जय श्री कृष्ण' मालिकेतील 'चिमुकला कृष्णा' तुम्हाला आठवतोय? 15 वर्षांत इतका मोठा बदल.. खास व्हिडीओ पाहून व्हाल हैराण... सध्या सर्वत्र चिमुकल्या कृष्णाची चर्चा...

मुंबई | छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर बाल कलाकारांच्या भूमिकेत झळकलेले चिमुकले कायम चाहत्यांच्या लक्षात राहतात. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होत असतात. एका मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या बाल कलारांना चाहते देखील डोक्यावर घेतात. एवढंच नाही तर, ते बाल कलाकार आता मोठे झाले असतील, ते आता कोणत्या क्षेत्रात काम करत असतील अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. पण सोशल मीडियावर कलाकारांचे व्हिडीओ आणि फोटो कायम व्हायरल होत असतात. आता देखील एका बाल कलाकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र ‘जय श्री कृष्णा’ मालिकेतील चिमुकल्या कृष्णाची चर्चा रंगत आहे..
‘जय श्री कृष्णा’ मालिकेतील चिमुकला कृष्णा भूमिका साकारलेल्या कलाकाराचं नाव धृती भाटिया आहे. बालपणी धृतीने कृष्णा ही भूमिका साकारली होती. धृती आता मोठी झाली आहे. धृती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर धृतीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. धृती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
View this post on Instagram
धृतीने काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त धृती भाटिया हिची चर्चा रंगत आहे. २००८ साली प्रासारित झालेल्या ‘जय श्री कृष्णा’ मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस आली. तेव्हा आपल्या खोडकर कृतीने धृतीने लहाण मुलांपासून वृद्धांना देखील स्वतःच्या प्रेमात पाडलं.
जेव्हा धृतीने वयाच्या दुसऱ्या वर्षी ‘जय श्री कृष्णा’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा तिने चाहत्यांच भरभरुन मनोरंजन केलं. चाहत्यांना देखील ‘जय श्री कृष्णा’ मधील धृतीचं अभिनय प्रचंड आवडलं.. आता धृतीला ओळखणं देखील कठीण आहे. सध्या धृतीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
