AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रंगभूमी असो वा कॅमेरा, अभिनय हा अभिनयच असतो!’, भरत जाधवांची पोस्ट सांगते त्यांच्या अनुभवाची कहाणी!

आपल्या अभिनयाने आणि अफाट ऊर्जेने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर भरत जाधव विविध पोस्ट शेअर करताना दिसतात.

‘रंगभूमी असो वा कॅमेरा, अभिनय हा अभिनयच असतो!’, भरत जाधवांची पोस्ट सांगते त्यांच्या अनुभवाची कहाणी!
भरत जाधव
| Edited By: | Updated on: Mar 19, 2021 | 12:10 PM
Share

मुंबई : अभिनेते भरत जाधव (Actor Bharat Jadhav) यांचे नाव उच्चारले की, ‘गोड गोजिरी, लाज लाजिरी…’ हे गाण किंवा ‘गलगले निघाले’, ‘जत्रा’, ‘पछाडलेला’ असे चित्रपट लगेच डोळ्यासमोर उभे राहतात. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाने आणि अफाट ऊर्जेने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर भरत जाधव विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट या विशेष असतात (Jatra Fame Actor Bharat Jadhav Share Post on social media How to face camera).

आपल्या लाडक्या अभिनेत्याने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टवर त्यांच्या चाहत्यांचे लक्ष असते. भरत जाधव यांनी नुकतीच एक अशीच महत्त्वाची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते अभिनयाविषयी सांगत आहेत. त्यांच्या या पोस्टमधून या क्षेत्रातील त्यांच्या संघर्षाची आणि अनुभवाची कल्पना येते.

भरत जाधव यांची खास पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

(Jatra Fame Actor Bharat Jadhav Share Post on social media How to face camera)

ते लिहीतात की, ‘रंगभूमीवर करा किंवा कॅमेरा समोर करा अभिनय हा अभिनय असतो. पण काही गोष्ठींच भान असणं आवश्यक आहे. रंगभूमीवर काम करत असताना तुम्हाला शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षका पर्यंत पोहोचायच असत… त्यासाठी देहबोलीच – आवाजाचं एक वेगळ वर्किंग असत. तर याउलट Camera समोर काम करताना तुमचे अतिशय सूक्ष्म हावभाव सुद्धा टिपले जातात, त्यामुळे काही Technical गोष्टी खुप जपाव्या लागतात.”

अभिनयाविषयीचे हे बारकावे भरत जाधव यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये मांडले आहे. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी हा संदेश नक्कीच मोलाचा ठरणार आहे. दांडगा अनुभव असणाऱ्या या अभिनेत्याकडून अभिनयाविषयीच्या या गोष्टी पोस्टच्या स्वरुपात पाहून अभिनयात करिअर करू इच्छिणारे नक्कीच आनंदी झाले असतील यात शंका नाही. सध्या भरत जाधव हे केदार शिंदे यांच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत झळकत आहेत.

लाडक्या ‘गलगलें’ची संघर्ष कथा…

भरत जाधव यांचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. त्यांनी भरत यांना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी भक्कम पाठींबा दिला होता. त्यांच्या आठवणी भरत जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केल्या होत्या. या संदर्भात एक किस्सा सांगताना ते म्हणाले, ‘एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते. त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासादरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते. अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या, पण वडिल त्यांना एक अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले. रात्री घरी आल्या नंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला. ते प्रवासी ‘ऑल द बेस्ट’ च्या प्रयोगाला चालले होते! आपल्या मुलाच्या नाटकासाठी लोकं गर्दी करतायत. या एकाच गोष्टीसाठी त्यांनी तो अपमान मुकाट सहन केला. खूप रडलो होतो त्या दिवशी (Jatra Fame Actor Bharat Jadhav Share Post on social media How to face camera).

सुदैवाने तेव्हा मला १०० रुपये नाईट मिळत होती. त्या दिवसापासून त्यांना टॅक्सी चालवणं आता बंद करा म्हणून सांगितलं. टॅक्सी चालवणं त्यांनी बंद केलं तरी ती टॅक्सी त्यांनी विकली नाही कारण त्यांना चिंता होती उद्या जर ह्याच एखाद नाटक नाही चाललं तर काय करणार. ज्या वेळेस मी पहिली लक्झरी कार ऑटोमॅटिक होंडा अकॉर्ड घेतली आणि त्यांना स्टीअरिंग वर बसवलं त्यावेळेस आम्हा दोघांनाही खुप भरून आलं होतं. त्यानंतर मी अनेक लक्झरी गाड्या घेतल्या.. एमडब्लू,मर्सडीज एस क्लास.’

मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या हयातीतच मी मला जेवढं शक्य होत ते सगळं सुखं त्यांना देऊ शकलो.अर्थात त्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावरच मी हा प्रवास केलाय. आजही माझ्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे. अण्णा… आज तुम्हाला खुप मिस करतोय. तुमच्या सारखा देव माणुस मी आयुष्यात पाहिला नाही’, असे म्हणत त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला होता.

(Jatra Fame Actor Bharat Jadhav Share Post on social media How to face camera)

हेही वाचा :

Ram Setu | ‘राम लला’समोर ‘राम सेतु’चा मुहूर्त संपन्न, अक्षय कुमारने शेअर केला खास फोटो!

First Photo | अमृता राव-आरजे अनमोलने शेअर केला बाळाचा फोटो, पाहा ‘वीर’ची पहिली झलक!

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.