AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाईट वागणुकीबद्दल नातीसमोर व्यक्त झाल्या जया बच्चन; म्हणाल्या “तुझ्या आजोबांना मी कधीच..”

अमिताभ आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचा वॉडकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'व्हॉट द हेल नव्या'चा हा दुसरा सिझन असून त्यामध्ये जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी तिघींमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

वाईट वागणुकीबद्दल नातीसमोर व्यक्त झाल्या जया बच्चन; म्हणाल्या तुझ्या आजोबांना मी कधीच..
नातीसमोर जया बच्चन झाल्या व्यक्तImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 09, 2024 | 9:15 AM
Share

मुंबई : 9 फेब्रुवारी 2024 | अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या व्हॉडकास्टचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडला गुरुवारी तिच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘लव्ह आज कल’ असं शीर्षक असलेल्या या एपिसोडमध्ये नव्याने तिची आई श्वेता नंदा आणि आजी जया बच्चन यांच्यासोबत प्रेम आणि नातं यांविषयी मोकळेपणे गप्पा मारल्या आहेत. एखाद्या नात्यात कोणती गोष्ट सर्वांत महत्त्वाची असते, ‘रेड फ्लॅग’ ही नवी संकल्पना काय, जया बच्चन यांना कोणती गोष्ट ‘रेड फ्लॅग’ वाटते, हे सर्व या एपिसोडमध्ये ऐकायला मिळालं.

आधी नव्याने आजी जया बच्चनला ‘रेड फ्लॅग’ म्हणजे नेमकं काय हे समजावलं. ती संकल्पना समजल्यानंतर जया म्हणाल्या, “नात्यातील वाईट वागणूक किंवा व्यवहार हा माझ्यासाठी सर्वांत मोठा रेड फ्लॅग असेल. जेव्हा लोक तू किंवा तुम असं संबोधतात, तेव्हा मला खूप राग येतो. तू कधी मला तुझ्या आजोबांना (अमिताभ बच्चन) तुम म्हणून बोलताना ऐकलंस का? हे ऐकायलाही फार अपमानास्पद वाटतं.”

यानंतर नव्याची आई यावर तिची मतं मांडते. “तोंडून बोलून केलेली हिंसा असो किंवा शारीरिक हिंसा.. मी या कोणत्याच गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाही. नात्यात एकमेकांविषयी आदर असणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुमचा जोडीदार तुम्हाला म्हणत असेल की एखाद्या गोष्टीमुळे त्याला त्रास होतोय, तर ती गोष्ट करू नये आणि त्यावर विचार करावा. इतकंच नव्हे, जर तुमचा पार्टनर तुमची माफी मागत असेल तर तुम्हाला ते भांडण फार खेचण्याची गरज नाही. कारण त्यांनी आधीच माफी मागितली आहे”, असं श्वेता नंदा म्हणाली.

या व्हॉडकास्टमध्ये नव्या पुढे महिलांच्या एकट्या राहण्याचा मुद्दा मांडते. “हे जग इतकं पुढे गेलंय, मात्र तरीही सध्याच्या घडीला महिलांनी सिंगल राहणं कठीणच आहे. लोकांना असं वाटतं की महिलेचा उद्देश हा फक्त मुलांना जन्म देण्याचा असावा. म्हणूनच तिच्यावर लग्नासाठी दबाव आणला जातो. समाज अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे की पुरुषांनी एकटं राहणं ठीक आहे. पण महिलांसाठी ते सोपं नाही. कधीही घाईगडबडीत लग्न करू नका. जेव्हा तुम्ही भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तेव्हाच पालक होण्याचा निर्णय घ्या” असं ती म्हणते.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत