‘तोंड फोडून टाकेन..’, पापाराझींवर भडकल्या जया बच्चन, दिली वॉर्निंग
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर चिडल्या आहेत. त्यांचा हा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तोंड बंद ठेवा, असं त्या पापाराझींना फटकारताना दिसत आहेत. जया बच्चन यांची अशा पद्धतीने चिडण्याची पहिलीच वेळ नाही.

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या तापट स्वभावामुळे सतत चर्चेत असतात. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जेव्हा त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ शूट करण्यासाठी पापाराझी समोर येतात, तेव्हा त्यांचा पारा आवर्जून चढतो. जया बच्चन यांनी आजवर अनेकदा पापाराझींना फटकारलं आहे. आता पुन्हा एकदा ते त्यांच्यावर चिडल्याचं पहायला मिळतंय. त्यांचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जया बच्चन त्यांची मुलगी श्वेता बच्चनसोबत मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमातून निघताना जेव्हा पापाराझी त्यांचे फोटो काढू लागले आणि इथे-तिथे धावपळ करू लागले, तेव्हा मात्र त्यांचा संताप अनावर झाला.
जया बच्चन यांनी कार्यक्रमात जाताना चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्या जसजशा पुढे चालू लागल्या, तसं अनेक फोटोग्राफर्सनी त्यांच्या भोवती घोळका केला आणि फोटो क्लिक करण्यासाठी गोंधळ करू लागले. सतत होणाऱ्या गोंगाटाने जया बच्चन वैतागल्या आणि काही सेकंदासाठी तिथेच थांबून पापाराझींकडे रागाने बघू लागल्या. “बस.. पुरे झालं. बाजूला व्हा”, असं त्या रागात म्हणाल्या आणि त्यानंतर मुलगी श्वेताने त्यांचा हात पकडून त्यांना तिथून नेलं.
View this post on Instagram
कार्यक्रमातून त्या जेव्हा बाहेर पडल्या, तेव्हा पुन्हा त्यांच्याभोवती पापाराझींनी गराडा घातला आणि फोटोसाठी गडबड-गोंधळ केला. अखेर चिडून जया बच्चन त्यांना म्हणाल्या, “तोंड बंद ठेवा, फोटो घ्या.. संपलं. तुम्ही फोटो घ्या, पण उद्धटपणा करू नका. कमेंट्स करत बसतात.” यानंतर एका व्यक्तीसोबत बोलताना जया बच्चन “तोंड फोडून टाकेन” असं म्हणतात दिसतं. हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी जया बच्चन यांची बाजू घेतली आहे. तर काहींनी त्यांना ट्रोल केलंय.
View this post on Instagram
पापाराझी कल्चरवर गेल्या काही महिन्यांपासून सतत संताप व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनीही पापाराझींना फटकारलं होतं. “तुमच्या घरी आईवडील आहे, मुलंबाळं आहेत, थोडीतरी लाज बाळगा”, अशा शब्दांत अभिनेता सनी देओलने राग व्यक्त केला होता. तर याच पापाराझी कल्चरला वैतागून क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने भारत सोडलं असावं, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
