सलमान-ऐश्वर्याचा हा चित्रपट पाहिला अन् जया बच्चन काही न बोलता थेट निघून गेल्या… दिग्दर्शकही विचारात पडले
सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा गाजलेला चित्रपट जो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला तो चित्रपट पाहून जया बच्चन यांनी अशी काही प्रतिक्रिया दिली होती की चित्रपटाचे दिग्दर्शक देखील विचारात पडले. त्यांना हेही समजत नव्हतं की नक्की जया यांना हा चित्रपट आवडला आहे की नाही.

जया बच्चन नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. जया बच्चन त्यांच्या फटकळ स्वभावामुळे जास्त चर्चेत असतात. हे फक्त त्यांच्या चाहत्यांच्याबाबतच होत नाही तर बऱ्याच सेलिब्रिटींनाही त्यांचा हा अनुभव आला आहे. त्यातील एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. संजय लीला भन्साळी हे त्यांच्या भव्य सेट्स, उत्तम संगीत आणि उत्तम प्रेमकथा असलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात.
सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा गाजलेला हा चित्रपट
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे अनेक चित्रपट आजही लोकांच्या मनात आहेत. त्यांच्या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटातील गाणी.असाच एक चित्रपट म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’. हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. आजही हा चित्रपट लोक आवडीने पाहतात आणि त्यातील गाणी देखील आजही लोकांच्या ओठांवर दिसतात. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर जया बच्चनची प्रतिक्रिया पाहून दिग्दर्शक स्वतःही थक्क झाले होते.
जया बच्चन यांना सलमान आणि ऐश्वर्याचा हा चित्रपट आवडला नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या प्रिव्ह्यू स्क्रीनिंग दरम्यान जया बच्चन यांनी गंभीर प्रतिक्रियेवरून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना असे वाटले की त्यांना सलमान आणि त्यांची सून ऐश्वर्या राय यांचा चित्रपट अजिबात आवडला नाही. एका मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांनी स्वत: याबद्दल सांगितलं होतं. दिग्दर्शकाने यासाठी तीन लोकांना श्रेय दिले. बरं त्यांच्या या चित्रपटाला जे बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशंसा मिळाली त्याबद्दलच एक श्रेय त्यांनी अभिनेत्री जया बच्चनला दिलं. तथापि, भन्साळी यांनी जयाला चित्रपट आवडत नाही असे वाटल्याने त्यांच्या एका गैरसमजाची आठवणही करून दिली.
भन्साळींना जय बच्चन यांनी फोन केला अन्….
‘हम दिल दे चुके सनम’ च्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर अनेक प्रेक्षक येऊन त्यांचे कौतुक करत होते, तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील संजय यांचे कौतुक केले पण जया बच्चन यांनी तसे केले नाही, जया भन्साळींकडे पाहून हसल्या आणि नंतर काहीही न बोलता शांतपणे निघून गेल्या. त्यानंतर जया बच्चन यांच्या शांततेने त्यांना असा विचार करायला भाग पाडले की कदाचित त्यांना हा चित्रपट आवडला नसेल.
तथापि, एके दिवशी जयाने संजय लीला भन्साळींना फोन केला आणि त्यांचा हा गैरसमज दूर केला. जया बच्चन यांना चित्रपटाचा तिरस्कार करण्याऐवजी ‘हम दिल दे चुके सनम’ इतका आवडला की त्यांनी बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी त्याची शिफारस केली आणि तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवण्याची खात्री केली.
