AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नानांच्या शोकसभेत खूर्चीवर न बसता जमिनीवरच बसले जयवंत वाडकर, सगळे पाहतच राहिले

Nana Patekar Condolence Meet: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर काल शोकसभा ठेवण्यात आली होती. या शोकसभेसाठी आलेल्या अभिनेते जयवंत वाडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओपाहून त्यांच्या कृतीचे अनेकांनी कौतुक केले.

Nana Patekar: नानांच्या शोकसभेत खूर्चीवर न बसता जमिनीवरच बसले जयवंत वाडकर, सगळे पाहतच राहिले
Jaywant WadkarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 2:03 PM
Share

अतिशय साधा पेहराव, कणखर आवाज, स्पष्ट वक्तेपणा, रांगडा स्वभाव म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. अगदी सर्वसामान्यांपासून ते अगदी बड्या कलाकारांपर्यंत नाना पाटेकर हे सर्वांना जवळचे वाटायचे. 8 ऑक्टोबर रोजी या अभिनेत्याचे अचानक निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. काल, मुंबईत शोकसभा ठेवण्यात आली. या शोकसभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये जयवंत वाडकर यांनी जे कृत्य केले ते पाहून सर्वजण पाहातच राहिले.

नाना पाटेकर यांच्या शोकसभेत अनेक राजकीय मंडळी तसेच कलाकार देखील हजर होते. नानांचे जवळचे मित्र जयवंत वाडकरही उपस्थित होते. नानांच्या निधनानंतर जयवंत वाडकर यांना मोठा धक्का बसला. आता शोकसभेत आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत होते. ते शोकसभेत आले. त्यांनी बसण्यासाठी खुर्ची शोधली नाही. ते थेट मंचावर गेले आणि तेथे जमिनीवर जाऊन बसले. नानांप्रमाणेच त्यांचा हा साधेपणापण सर्वजण पाहातच राहिले.

सध्या सोशल मीडियावर जयवंत वाडकर यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अगदी नानांप्रमाणेच त्यांचा साधेपण दिसून येत आहे असे म्हटले आहे. आज कितीतरी स्टार्स आणि त्यांचे रुसवे-फुगवे, मान-अपमानाच्या गोष्टी व्हायरल होत असतात. पण, जयवंत वाडकरांची ही कृती त्या सर्वांना खूप काही शिकवणारी आहे.

नानांच्या निधनानंतर जयवंत वाडकर दु:ख व्यक्त करत म्हणाले होते की, ” मला कळलं आताच खरं तर शब्द सुचत नाहीये, खरंच काय बोलू मी, एवढं काम त्याच्याबरोबर केले आहे, आमची सुरुवात त्याच्यासोबत झाली आहे, सतिश पुळेकर आमचे गुरु, आमच्या सगळ्या वन एक्च प्लेला गायडन्स करणं, म्हणजे आता खूप खूप आठवणी आठवतं आहे, त्याच्यासोबत शेवटचे काम केले होते ते नटसम्राटमध्ये, त्या चित्रपटातील आठवणी तर आहेतच. मला कळत नाही देवाला इतके उत्साही माणूस कसे काय आवडतात?, मला काही कळलेच नाही म्हणजे सकाळी जो फोन आला ना उडालो मी, मग मी कन्फर्म केलं एकदा, पण ही खूपच धक्कादायक आणि वाईट गोष्ट आहे, मी आता काय बोलू कळतं नाही, मला सूचतच नाहीये, सॉरी पण खूप वाईट बातमी आहे ही.

Follow Us
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?