AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jhimma 2 Teaser : सात जणींची गँग पुन्हा निघाली ट्रिपला; पहा ‘झिम्मा 2’चा जबरदस्त टीझर

2021 मध्ये 'झिम्मा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्यातून एक चांगला संदेश देण्यात आला आणि त्यामुळे प्रेक्षक प्रभावित झाले. म्हणूनच आता 'झिम्मा 2'ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याचा ट्रेलर एकदा पहाच!

Jhimma 2 Teaser : सात जणींची गँग पुन्हा निघाली ट्रिपला; पहा 'झिम्मा 2'चा जबरदस्त टीझर
Jhimma 2 TeaserImage Credit source: Tv9
| Updated on: Oct 30, 2023 | 12:51 PM
Share

मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 | ‘झिम्मा’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर प्रेक्षकांना त्याच्या दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर ‘झिम्मा 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘झिम्मा’ या चित्रपटाप्रमाणेच दुसऱ्या भागाचा टीझरसुद्धा अनोखा असून पुन्हा एकदा यामधील महिला गँग रियुनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा या टीझरमध्ये पहायला मिळत आहेत.

”यावेळेला खूपच व्हरायटी आहे”, असा सिद्धार्थ चांदेकरच्या तोंडी असलेला डायलॉग चित्रपटाच्या कथेसाठी समर्पक वाटतोयय. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत. मागच्यावेळेस नवीनच मैत्री झाली होती, हळूहळू ती बहरत गेली. आणि आता ‘झिम्मा 2’मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचं दिसत आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्या आहेत.

पहा टीझर

‘झिम्मा’मधील या सात मैत्रिणींना प्रेक्षकांनी आपलंसं केलं आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहोर उमटवली. महिलांना त्यांच्या अंतरंगाचा शोध या निमित्ताने घेता आला. आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणं किती आवश्यक आहे, याची जाणीव ‘झिम्मा’ने करून दिली. हेच ‘स्वत्त्व’ शोधायला लावणारा हा चित्रपट पुन्हा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला येत आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एंजॉय करायला शिकवणारा हा चित्रपट आहे.

याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, ”यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेक पुरस्कारांवर चित्रपटाने मोहोर उमटवली. ‘झिम्मा’ पाहून अनेक महिलांनी, ज्या कधीही कुटुंबाशिवाय बाहेर फिरल्या नाहीत, त्यांनी स्वतः मैत्रिणींसोबत सहली आयोजित केल्या. प्रेक्षकांनी मेसेजद्वारे, प्रत्यक्ष भेटून आम्हाला ‘झिम्मा 2’ यावा, अशी मागणीही केली. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आम्ही ‘झिम्मा 2’साठी प्रेरित झालो आणि चांगली कथा तयार झाली. प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत, पण मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात. याच कल्पनेवर आधारित ही ‘रियुनियन’ दुपटीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणार, हे नक्की.” झिम्मा 2 हा चित्रपट येत्या 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.