मुंबई : काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकरही सामील असलेला पाहायला मिळाला. पोस्टरवरुन हा काही तर भन्नाट प्रकार असणार असं प्रेक्षकांना वाटलं, मात्र या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं यावरील पडदा उठला असून ‘झिम्मा’ या चित्रपटाचा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठी सिनेसृष्टीतील या आघाडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना एकाच सिनेमात पाहता येणार आहे. (Jhimma: Teaser release of ‘Jhimma’ on the occasion of ‘Women’s Day’)