बबड्या कायम एक नंबर, ‘अग्गंबाई सासूबाई’च्या चित्रिकरणाचा लास्ट डे, आशुतोष पत्कीला आठवणींचा उमाळा

मराठी भाषेपासून, कलाकाराने कॅमेरासमोर भावना कशा व्यक्त कराव्यात आणि लोकांच्या मनाचा कसा ठाव घ्यावा हे या मालिकेने शिकवलं, असं आशुतोष लिहितो. (Ashutosh Patki Aggabai Sasubai)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:32 AM, 8 Mar 2021
बबड्या कायम एक नंबर, 'अग्गंबाई सासूबाई'च्या चित्रिकरणाचा लास्ट डे, आशुतोष पत्कीला आठवणींचा उमाळा
बबड्या, शुभ्रा आणि आजोबा

मुंबई :अग्गंबाई सासूबाई‘ (Aggabai Sasubai) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असून त्याजागी ‘अग्गंबाई सूनबाई’ (Aggabai Soonbai) हे मालिकेचं दुसरं पर्व सुरु होत आहे. मालिकेत सोहम म्हणजेच सर्वांच्या ‘लाडक्या’ बबड्याने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. बबड्याची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष पत्कीने (Ashutosh Patki) इन्स्टाग्रामवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Marathi Actor Ashutosh Patki remembers fun on sets of TV Serial Aggabai Sasubai)

काय म्हणतो आशुतोष पत्की?

“सोहम” ऊर्फ “बबड्या”. काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर हे पात्र कायम 1 नंबरवर असेल माझ्यासाठी, कारण “अग्गंबाई सासूबाई”कडून अनेक धडे गिरवले. मराठी भाषेपासून, कलाकाराने कॅमेरासमोर भावना कशा व्यक्त कराव्यात आणि लोकांच्या मनाचा कसा ठाव घ्यावा हे या मालिकेने शिकवलं, असं आशुतोष लिहितो.

“सगळ्या दिग्गज कलाकारांच्या सहवासात खूप शिकलो, सगळ्यांनी मला मनापासून सांभाळून घेतलं यासाठी मी कृतज्ञ आहे. झी मराठी आणि आमचे निर्माते सुनील भोसले यांचा मी आभारी आहे, की “सोहम” म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक, तुम्ही सुद्धा खूप प्रेम दिलत.” अशा शब्दात आशुतोषने आभार व्यक्त केले.

“पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त”

“हे पहिलं पर्व संपताना सगळा प्रवास आठवतोय. खूप आठवण येईल सगळ्यांची पण “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त”… लवकरच एक नवीन चेहरा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करीन तुमच्या मनात घर करण्याचा.. “अग्गंबाई सूनबाई”च्या टीमला यशासाठी शुभेच्छा. तुम्ही धमाका घडवाल याची खात्री आहे, असा विश्वास आशुतोषने व्यक्त केला.

शुभ्राची भूमिका घेणारी तेजश्री प्रधान, आसावरीची भूमिका रेखाटणाऱ्या दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिजीत राजेची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि आजोबांच्या भूमिकेत जान ओतणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबतचा एक फोटो आशुतोषने शेअर केला आहे.

पाहा इन्स्टाग्राम पोस्ट :

 

View this post on Instagram

(Marathi Actor Ashutosh Patki remembers fun on sets of TV Serial Aggabai Sasubai)

A post shared by 𝐀𝐬𝐡𝐮𝐭𝐨𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐤𝐢 (@ashutoshpatki)

अभिनेता आशुतोष पत्की याची ही पहिलीच मालिका होती. आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा. आशुतोषने याआधी अकल्पित, वन्स मोअर, सँड्रा बेड्स संदीप यासारख्या मोजक्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

दुसऱ्या पर्वात बबड्या कोण साकारणार

‘अग्गंबाई सूनबाई’मध्ये दोन मुख्य पात्र ‘शुभ्रा आणि सोहम’ यांना रिप्लेस करण्यात आलं आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने गाजवलेली शुभ्राची भूमिका आता अभिनेत्री उमा ऋषिकेश पेंढारकर साकारणार आहे. तर, आशुतोषची ‘बबड्या’ ही भूमिका अभिनेता अद्वैत दादरकर साकारणार आहे. ‘बबड्या’च्या भूमिकेसाठी अभिजीत खांडकेकरचे नावं देखील पुढे येत होते. मात्र, आता अद्वैतच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून, लवकरच तो चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

संबंधित बातम्या :

‘माझ्या नवऱ्याची बायको’मधला ‘हा’ अभिनेता साकारणार ‘बबड्या’ची भूमिका!

(Marathi Actor Ashutosh Patki remembers fun on sets of TV Serial Aggabai Sasubai)