फोटोतील चिमुकल्याला कोणता अभिनेता? एका भूमिकेमुळे रातोरात स्टार झाला हा अभिनेता, आता त्याला ओळखंणही कठीण
फोटोमधील हा चिमुकला एक प्रसिद्ध अभिनेता आहे, जो एका शोमुळे रातोरात स्टार झाला. लोकांच्या पसंतीस उतरला. त्याला प्रचंड फेन अन् नेम मिळालं.पण अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला. अचानक जेव्हा 11 वर्षानंतर त्याचा फोटो समोर आला तर त्याला ओळखणेही कठीण झालं आहे.

चित्रपट असो वा टीव्ही इंडस्ट्री, अभिनय क्षेत्रात करिअर करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. इथे आपल्या मेहनतीने आपली ओळख निर्माण करावी लागते. पण कधी कधी असेही घडते की, पहिल्याच भूमिकेमुळे काहीजण रातोरात स्टार होतात. पैसा, फेम, नेम सगळं मिळतं. पण नंतर अचानक गायब होतात. इंडस्ट्रीच सोडून देतात.
टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य केलेला अभिनेता
आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगत आहोत. ज्याने टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य केलं. त्याच्या एका भूमिकेमुळे तो प्रेक्षकांचा आवडता बनला. पण अशी एक दुर्दैवी घटना घडली ज्यानंतर त्याने केवळ टीव्हीच नाही तर सोशल मीडियापासूनही दूर झाला. कोण आहे हा अभिनेता?
या एका शोमुळे रातोरात स्टार झाला
हा अभिनेता आहे रजत टोकस. ज्याने प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘जोधा अकबर’ मध्ये अकबरची भूमिका केली होती. या शोमधून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या भूमिकेने त्याला एक वेगळीच ओळख दिली. लोकांचा तो आवडता बनला. या मालिकेनंतर त्याला मालिकांच्या ऑफर येतच गेल्या. जेव्हा जेव्हा अकबरच्या भूमिकेबद्दल बोलले जाते तेव्हा त्याचा चेहरा सर्वांसमोर येतो. ‘जोधा अकबर’ नंतर रजत टोकसने पृथ्वीराज चौहान सारखा सुपरहिट शो केला आहेत.
11 वर्षांनंतर ओळखणे कठीण
रजत टोकस आज टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर सक्रिय नाही. त्याचे इंस्टाग्रामवर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने 19 जुलै 2024 रोजी त्याची शेवटची पोस्ट शेअर केली होती. रजतने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याचे एक वर्ष जुने फोटो दिसतात, ज्यामध्ये त्याला ओळखणे देखील खूप कठीण आहे. 11 वर्षांनंतर, अभिनेत्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. त्याचा आताचा लूक पाहून तो पूर्वीपेक्षा फारच बदललेला दिसत आहे.
View this post on Instagram
चेहऱ्यावरील दाढी आणि मिशा पाहून चाहते त्याला ओळखूच शकले नाही
रजतचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते त्यामुळे तो सोशल मीडियापासून इतक्या वर्ष लांबच होता. आता काही दिवसांपूर्वी रजत टोकसनेच त्याच्या इन्स्टा हँडलवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. तोही इतक्या वर्षांनी जो चाहत्यांनाही खूप आवडला. या फोटोमध्ये रजतचा लूक आश्चर्यकारक बदललेला दिसत आहे. रजतच्या चेहऱ्यावरील दाढी आणि मिशा पाहून चाहते त्याला ओळखू शकत नाहीत. पण त्याचे निरागस हास्य अजूनही लोकांना त्याच्याबद्दल वेड लावत आहे. या फोटोमध्ये रजत निळ्या स्वेटशर्टमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही.
फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
रजतचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोवर कमेंट करत एका युजरने लिहिले आहे की, ‘टचवुड स्माइल को नजर ना लागे’. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘तू अभिनयात कधी परतणार? चाहते तुला मिस करत आहेत’. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘रियल किंग’. रजत टोकसने 2015 मध्ये त्याची मैत्रीण सृष्टी नायरशी लग्न केले होते, जिच्यासोबत तो आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे.
