AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जॉन अब्राहमकडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मोठे पाऊल, सोशल मीडिया केला NGOच्या हवाली!

भारतात कोरोनाचा उद्रेक वेगाने वाढत आहे. कोरोना संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक सेलिब्रिटी या अडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे येत आहेत. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) यानेही आता मदतीचा हात पुढे केला आहे.

जॉन अब्राहमकडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मोठे पाऊल, सोशल मीडिया केला NGOच्या हवाली!
जॉन अब्राहम
| Edited By: | Updated on: May 01, 2021 | 8:36 AM
Share

मुंबई : भारतात कोरोनाचा उद्रेक वेगाने वाढत आहे. कोरोना संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक सेलिब्रिटी या अडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे येत आहेत. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) यानेही आता मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स स्वयंसेवी संस्थेकडे सोपवली आहेत. खुद्द जॉन यांने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे (John Abraham gives his social media accounts access to NGO for helping corona patients).

जॉनने लिहिले की, ‘सध्या आपला देश बर्‍याच संकटांशी लढा देत आहे. प्रत्येक मिनिटाला  असे बरेच लोक आहेत ज्यांना ऑक्सिजन, आयसीयू बेड, लस आणि खाण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. तथापि, या कठीण काळात आपण सर्वजण एकमेकांना आधार देत आहोत.

जॉनने पुढे लिहिले की, ‘आजपासून मी माझी सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स आमच्या भागीदार स्वयंसेवी संस्थेकडे सोपवत आहे. माझ्या अकाऊंटवर आता केवळ अशीच सामग्री पोस्ट केली जाईल, ज्यामुळे गरजू लोकांना मदत होईल. ही समस्या दूर करण्यासाठी मानवतेचा प्रसार करण्याचा काळ आहे. या युद्धात जिंकण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करूया. घरी रहा आणि सुरक्षित रहा.’

वाचा जॉन अब्राहमची पोस्ट

 (John Abraham gives his social media accounts access to NGO for helping corona patients)

‘सत्यमेव जयते 2’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

जॉन अब्राहम (John Abraham) याचा आगामी चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’  (Satyameva jayate 2)चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता उद्रेक पाहून निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंतच्या रिलीजच्या तारखेनुसार जॉनची बॉक्स ऑफिसवर सलमान खानशी ‘टक्कर’ होणार होती. वास्तविक, जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट सलमान खानचा चित्रपट ‘राधे’ बरोबर प्रदर्शित होत होता. ही टक्कर पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्साही झाले होते, पण आता ‘सत्यमेव जयते 2’ची रिलीज डेट बदलली आहे, ही स्पर्धा देखील टाळण्यात आली आहे.

मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात मनोज बाजपेयी यांच्यासह अनेक स्टार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. 2018च्या अ‍ॅक्शन ड्रामा ‘सत्यमेव जयते’  चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या चित्रपटात दिव्या खोसला कुमार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी देखील ‘सत्यमेव जयते’चे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनीच केले होते आणि 2018 च्या स्वातंत्र्य दिनी  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा पहिला भाग अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटाशी स्पर्धा करत होता, पण सत्यमेव जयते या चित्रपटाला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती.

(John Abraham gives his social media accounts access to NGO for helping corona patients)

हेही वाचा :

ऋषी कपूर यांच्या आठवणीने नीतू कपूर झाल्या भावूक, म्हणाल्या ‘तुमच्याशिवाय आयुष्य आता…’

Rohit Sardana | स्वत: कोरोनाग्रस्त असतानाही इतरांसाठी काळजी, रोहीत सरदानांचे शेवटचे 3 ट्विट पाहिलेत का?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.