AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर जॉली एलएलबी 3 वरचं ग्रहण दूर झालं; मात्र सेन्सॉर बोर्डाचा चित्रपटाबाबत मोठा निर्णय

'जॉली एलएलबी 3'च्या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. पण चित्रपट रिलीज होण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. पण आता सेन्सॉर बोर्डाचा चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेत अखेर हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

अखेर जॉली एलएलबी 3 वरचं ग्रहण दूर झालं; मात्र सेन्सॉर बोर्डाचा चित्रपटाबाबत मोठा निर्णय
Jolly LLB 3 has received the green signal from the Censor Board, received a U/A certificateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2025 | 5:46 PM
Share

‘जॉली एलएलबी 3’च्या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. या यशस्वी फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात, जॉलीची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. अक्षय कुमार पुन्हा एकदा कानपूरचे वकील जगदीश्वर मिश्रा म्हणून परतणार आहे, तर अर्शद वारसी मेरठचे वकील जगदीश त्यागी म्हणून न्यायालयात त्यांचा सामना करताना दिसणार आहे.

चित्रपटाबाबत काही अडचणी समोर आल्या होत्या

एकाच चित्रपटात दोन्ही कॉमेडीकिंग एकत्र असल्याने प्रेक्षकांनाही चित्रपटाची उत्सुकता आहे. पण त्या चित्रपटाबाबत काही अडचणी समोर आल्या होत्या. काही डायलॉग आणि दृष्यांमुळे या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून रोख लावण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या प्रदर्शनाच्याही अडचणी वाढल्या होत्या. मात्र आता या चित्रपटावरील ग्रहण दूर झालं आहे. चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून हिरवा कंदील मिळाला आहे.

चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाचे काही निर्णय 

19 सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपटाला परवानगी देण्याआधी सेन्सॉर बोर्डाने काही निर्णय घेतले आहेत. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही डायलॉग आणि सीन्समध्ये खूप बदल केले आहेत. त्यापैकी एक मोठा बदल म्हणजे चित्रपटाच्या शेवटी असलेल्या एका दृश्याला कात्री लावली आहे. आणि काही संवाद बदलण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ‘जॉली एलएलबी’च्या प्रदर्शित होण्याला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे.

जॉली एलएलबी 3 मध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत

एका वृत्तानुसार, जॉली एलएलबी 3 मधील अनेक दृश्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रथम, चित्रपटातून जुना डिस्क्लेमर काढून टाकण्यात आला आहे आणि त्याऐवजी नवीन सीन्स टाकण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, अनेक दृश्यांमध्ये दाखवलेले अल्कोहोल ब्रँड अस्पष्ट करण्यात आले आहेत आणि चित्रपटातून “फ***र” (Fu***r) हा शब्द देखील काढून टाकण्यात आला आहे. सीबीएफसीने निर्मात्यांना पोलिस अधिकारी एका वृद्धाला मारहाण करताना दिसणारे दृश्य बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दुसऱ्या एका दृश्यात जानकी (सीमा बिस्वास) शेतकऱ्यांच्या मालमत्तेसाठी लढताना दिसत आहे. तिच्या हातातली फाईल अस्पष्ट करण्यात आली आहे. दुसऱ्या भागात “जानकी अम्माचे गाव फक्त एक आहे… मी तिच्या तोंडावर चेक फेकला,” हा संवादही बदलण्यात आला आहे.

या वयापेक्षा जास्त वयाची मुले ‘जॉली एलएलबी 3’ पाहू शकतील

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी स्टारर “जॉली एलएलबी 3” मध्ये सर्व बदल केल्यानंतर, चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र मिळाले आहे. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले हा चित्रपट पाहू शकतात. चित्रपटाचा रनटाइम अंदाजे 2 तास 37 मिनिटे आहे. जॉली एलएलबी 3 फ्रँचायझीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा पहिला भाग 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. अमृता राव, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला ही कलाकारांची टीम पहिल्या भागात दिसली होती.

दुसरा भाग 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि सौरभ शुक्ला यांनी जज त्रिपाठीची भूमिका केली होती. आता, आगामी चित्रपटात, अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला, अमृता राव आणि हुमा कुरेशी सह अनेक कलाकार आहे ज्यामुळे मनोरंजनाचा डोस आता दुप्पट मिळणार आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.