AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालिकेचं शूटिंग संपवून घरी जाताना पेट्रोल पंपावर थांबला अन्..; अभिनेत्याच्या निधनाने हळहळ

टीव्ही मालिकांमधील ज्युनियर आर्टिस्ट संजीब सिंह यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. शूटिंग संपल्यानंतर ते घरी जात होते. गाडीत पेट्रोल भरण्यासाठी ते पेट्रोल पंपावर थांबले आणि तिथेच ते अचानक कोसळले

मालिकेचं शूटिंग संपवून घरी जाताना पेट्रोल पंपावर थांबला अन्..; अभिनेत्याच्या निधनाने हळहळ
ज्युनियर आर्टिस्ट संजीब सिंहImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2026 | 8:17 AM
Share

‘डॉ. आरंभी’ या मालिकेचं शूटिंग संपवून घरी परतत असलेल्या ज्युनियर आर्टिस्ट संजीब सिंह यांचं रविवारी पहाटे निधन झालं. ते 51 वर्षांचे होते. ‘न्यूज 9’ने दिलेल्या वृत्तानुसार, संजीब यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. या घटनेनंतर चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांच्या आरोग्याबद्दलची चिंता पुन्हा एकदा समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजीब सिंह हे मुंबईतील साकीनाका इथल्या एसजे स्टुडिओमध्ये ‘डॉ. आरंभी’ या मालिकेचं शूटिंग करत होते. दुपारी दोन वाजता त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती आणि त्या दिवसाचं काम पहाटे 3 वाजताच्या सुमारास संपलं, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’चे (FWICE) महासचिव अशोक दुबे यांनी दिली.

शूटिंगदरम्यान अस्वस्थ वाटल्याची तक्रार

शूटिंगदरम्यान संजीब यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती आणि विश्रांतीसाठी ते मधे मधे छोटे ब्रेकही घेत होते. शूटिंग पूर्ण झाल्यावर ते मोटरसायकलवरून घराकडे निघाले होते. घरी जात असताना गाडीत पेट्रोल भरण्यासाठी ते एका पेट्रोल पंपावर थांबले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. संजीब सिंह यांच्या पश्चात बहीण आणि भाऊ असा परिवार असून ते कोलकातामध्ये राहतात.

आर्थिक मदतीसाठी प्रयत्न

अशोक दुबे यांनी सांगितलं की, त्यांच्या बहिणीचा घटस्फोट झाला आहे आणि भाऊ आजारी आहे. संजीब यांच्या मृतदेहाचं कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. FWICE त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला असून अंतिम संस्कारासाठी त्यांचं पार्थिव कोलकाता इथं नेण्याची व्यवस्था केली जात आहे. एफडब्ल्यूआयसीईचे महासचिव अशोक दुबे यांनी मालिकेचे निर्माते मल्हार क्रिएशन्सच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला आहे. त्यांनी निर्मात्यांना सिंह यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. प्रॉडक्शन हाऊसने कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली पाहिजे, ज्यात त्यांच्या कामासाठीच्या प्रवासाचाही समावेश आहे, असंही ते म्हणाले. ज्युनियर आर्टिस्टचे पुरवठादार रवींद्र सुरी यांनीही त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

संजीब सिंह यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील कामगारांना अनेकदा सामोरं जाव्या लागणाऱ्या दीर्घ आणि व्यस्त कामाच्या वेळापत्रकाकडे पुन्हा लक्ष वेधलं गेलं आहे. अशोक दुबे यांनी अशीही माहिती दिली की, जवळपास महिनाभरापूर्वी युनियन निवडणुका जिंकल्यानंतर सिंह यांची ज्युनियर आर्टिस्ट कमिटीवर निवड झाली होती. दरम्यान संजीब सिंह यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी FWICE प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहिण्याची शक्यता आहे.

Follow Us
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी