AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaali Poster Row: “तुमचंही शीर धडापासून वेगळं व्हावं अशी इच्छा आहे का?”, कालीच्या वादग्रस्त पोस्टरवरून महंतांचा निर्मातीला इशारा

"हे चालणार नाही. मी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करतो की त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि चित्रपटावर बंदी घालावी. जर कारवाई केली नाही तर, आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू जी हाताळणं कठीण होईल," अशा इशारा त्यांनी दिला.

Kaali Poster Row: तुमचंही शीर धडापासून वेगळं व्हावं अशी इच्छा आहे का?, कालीच्या वादग्रस्त पोस्टरवरून महंतांचा निर्मातीला इशारा
देवी कालीच्या वादग्रस्त पोस्टरवरून महंतांचा निर्मातीला इशारा Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 10:00 AM
Share

काली (Kaali) चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील हनुमानगढी मंदिराच्या महंतांनी चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांना धमकी दिली आहे. हनुमानगढीचे महंत राजू दास (Mahant Raju Das) यांनी मंगळवारी एक निवेदन जारी करून म्हटलं की, चित्रपट निर्मात्यांनी केलेल्या उद्धटपणाला क्षमा करता येणार नाही. महंत राजू दास म्हणाले की, हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर कोणीही सांभाळू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण करू. त्यांनी चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांना उद्देशून म्हटलं की, तुम्ही नेमकी इच्छा काय आहे? की तुमचंही शीर धडापासून वेगळं व्हावं? दिग्दर्शिका, कवयित्री आणि अभिनेत्री लीना मणिमेकलाई यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. या पोस्टरमधअये देवी कालीच्या वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढत असताना दिसतेय. अभिनेत्रीच्या एका हातात LGBTQ चा ध्वज आहे. या पोस्टवरून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.

रामाची नगरी असलेल्या अयोध्येतील प्रतिष्ठित सिद्धपीठ हनुमानगढीचे पुजारी राजू दास यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत म्हटलं, “लहानपणी आपण ज्याप्रकारे बाहुल्यांशी खेळायचो, तशाच प्रकारे आता काही लोक सनातन धर्माशी खेळत आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधी भगवान श्री राम यांना काल्पनिक म्हटलं जातं तर कधी भारत मातेचं नग्न चित्र बनवलं जातं. एवढंच नाही तर आता माँ कालीच्या हातात सिगारेट दाखवण्यासारखं महापाप घडलं आहे. असंच चालू राहिलं तर हिंदू समाजाच्या संयमाचा बांध तुटेल आणि हिंदू समाज रस्त्यावर उतरला तर आमच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्यांना जगात कुठेही राहायला जागा मिळणार नाही.”

लीना यांचं ट्विट

त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला चित्रपट निर्मात्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे. “हे चालणार नाही. मी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करतो की त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि चित्रपटावर बंदी घालावी. जर कारवाई केली नाही तर, आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू जी हाताळणं कठीण होईल,” अशा इशारा त्यांनी दिला. भारतीय युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस शरद शुक्ला यांनीसुद्धा चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. शरद शुक्ला म्हणाले, “अशा वेब सीरीज आणि माहितीपट बनवणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजं.”

चित्रपट निर्मात्या लीना यांनी 2 जून 2022 रोजी ट्विटरवर माहितीपट कालीचं पोस्टर शेअर केला होता. ‘कॅनडा चित्रपट महोत्सवात (रिदम्स ऑफ कॅनडा) ही डॉक्युमेंट्री लाँच करण्यात आली आहे. मी अत्यंत उत्साही आहे’, असं त्यांनी लिहिलं होतं. लीना यांच्या या माहितीपटाचं नाव काली आहे. या पोस्टरमध्ये माँ कालीच्या वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून हे पाहून सोशल मीडियावरील यूजर्स संतापले आहेत. माँ कालीच्या वेशभूषेतील अभिनेत्रीने एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ चा ध्वज घेऊन दिसत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.