AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेता 29 वर्ष लहान तरुणीसोबत अडकला विवाहबंधनात; सावत्र आईला मुलगी म्हणाली…

'प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी...', ७० वर्षीय वडिलांनी २९ वर्ष लहान तरुणीसोबत लग्न केल्यानंतर मुलीची सावत्र आईबद्दल प्रतिक्रिया..., आजही अभिनेता चौथ्या लग्नामुळे चर्चेत...

वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेता 29 वर्ष लहान तरुणीसोबत अडकला विवाहबंधनात; सावत्र आईला मुलगी म्हणाली...
| Updated on: Mar 08, 2023 | 4:18 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी असे आहे की, ते त्यांच्या कामामुळे कमी आणि खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आले. सेलिब्रिटींची भांडणं, मैत्री, प्रेम…इत्यादी गोष्टी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. काही कलाकारांनी तर स्वतःच्या नावाचा ठसा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील नोंदवला आहे. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते कबीर बेदी. बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत काम केलेले अभिनेते कबीर बेदी त्यांच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. कबीर बेदी यांनी चार लग्न केली, ज्यामुळे त्यांना अनेकदा टीकेचा देखील सामना करावा लागला.

कबीर बेदी यांनी स्वत: त्यांच्या ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द ऍक्टर’ या आत्मचरित्रातून त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले आहेत. कबीर बेदी यांच्या चौथ्या पत्नीबद्दल, त्यांची मुलगी पूजा बेदीने अशी काही प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे कबीर यांचं चौथं लग्न आणि लेकीने केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत आलं.

कबीर बेदी यांचे पहिलं लग्न नृत्यांगना प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झालं होतं. कबीर आणि प्रोतिमा यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव पूजा बेदी, तर मुलाचं नाव सिद्धार्थ असं होतं. लग्नानंतर दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कबीर यांनी दुसरं लग्न केलं.

कबीर बेदी यांनी दुसरं लग्न ब्रिटिश मॉडल सुसैन हम्फ्रे हिच्यासोबत केलं. पण दोघांचं नातं देखील अधिक काळ टिकलं नाही. त्यानंतर अभिनेत्याने तिसरं लग्न अभिनेत्री निक्की बेदी हिच्यासोबत केलं. पण दोघांनी देखील फार कमी दिवसांत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशाच चौथ्या लग्नानंतर अभिनेत्याला टीकेचा सामना करावा लागला.

कबीर बेदी याचं चौथे लग्न मॉडेल परवीन दोसांझ हिच्यासोबत झालं. वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेत्याने २९ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कबीर बेदी यांची चौथी पत्नी मुलगी पूजा बेदीपेक्षा चार-पाच वर्षांनी लहान आहे. पूजा आणि परवीनचे अजिबात पटत नसल्याचं देखील अनेकदा समोर आलं.

एकदा पूजा बेदी सावत्र आई परवीन हिच्याबद्दल वक्तव्य केलं ज्यामुळे अभिनेत्याचं चौथं लग्न तुफान चर्चेत आलं. वडिलांच्या चौथ्या लग्नानंतर पूजा म्हणाली होती की, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी सावत्र आई असतेच… आता माझ्यापण आली आहे…’, कबीर बेदी आणि परवीन यांची लंडनमध्ये एका नाटकादरम्यान भेट झाली होत. त्यानंतर या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.