‘तर मी पोलिसांकडे घेऊन गेले असते’ पापराझींच्या वागण्यावर काजोलचा संताप, म्हणाली ‘हे फार विचित्र’
काजोलने अलीकडेच पापाराझींच्या वागण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पापाराझींच्या सततच्या पाठलाग करण्याला तिने "विचित्र आणि अस्वस्थ करणारे" म्हटले आहे. काजोलने पापाराझींच्या अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या ‘मां’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात काजोल एका संरक्षक आईच्या भूमिकेत आहे जी आपल्या मुलीला सर्व संकटांपासून वाचवण्यासाठी संघर्ष करते. काजोलचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. कारण अभिनेत्री पहिल्यांदाच अशा भूमिकेत दिसणार आहे.याच संदर्भात दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने पॅपराझींच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. तिने पॅप्सच्या या वागण्याला थोडे विचित्र आणि थोडे अपमानजनक असल्याचं म्हटले आहे.
विचित्र आणि थोडा अपमानजनक वाटते पॅप्सची पद्धत
काजोलने पापाराझींवर तिच्या वैयक्तिक स्पेपमध्ये कायम घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तिने विशेषतः अंत्यसंस्कार आणि खाजगी क्षणांबद्दल बोलून दाखवले. तिने सांगितले की पापाराझी सतत सतत पाठलाग करतात हे खूपच त्रासदायक आहे. ती म्हणाली की ‘पॅपराझी संस्कृतीबद्दल मी थोडी जागरूक आहे. मला असे वाटते की काही ठिकाणे अशी आहेत जिथे ते नसावेत. जसे की जेव्हा ते एखाद्याच्या अंत्ययात्रेत कलाकारांच्या मागे धावतात आणि फोटो मागतात तेव्हा मला खूप विचित्र वाटते. मला हे विचित्र आणि थोडे संतापजनक वाटते. मला हे देखील विचित्र वाटतं की आपण लंचला देखील जाऊ शकत नाही.”
जेव्हा काजोलला विचारण्यात आले की तिला पापाराझी संस्कृतीत काय बदल करायचे आहेत, तेव्हा काजोलने म्हटले की, ‘मला वाटते की काही ठिकाणी ते नसावेत. त्यांचा सतत पाठलाग करणं मला ते अनादरपूर्ण आणि विचित्र वाटतं’
‘मी कुठे बाहेर पडले की ते पाठलाग करतात’
तिचा मुद्दा पुढे मांडताना तिने हे देखील सांगितले की ‘मी कुठे बाहेर पडले की पापाराझी जुहू ते वांद्रे पर्यंत काही किलोमीटर तिचा पाठलाग करतात आणि मी कुठे जात आहे आणि मी कोणत्या इमारतीत जात आहे हे पाहतात. मला ते खूप त्रासदायक वाटतं. जर मी सामान्य माणूस असते तर तुम्ही असे केले असतं का? आणि मी तुम्हाला पोलिसांकडे नेलं नसतं का? आणि म्हटले नसते की हा माणूस माझा पाठलाग करत आहे म्हणून. पण आता अशा परिस्थिती मी पोलिसांना काय सांगणार?” असं म्हणतं तिने तिची नाराजी व्यक्त केली आहे.
अनेक सेलिब्रिटींच्या तक्रारी आहेत
काजोल ही एकटी नाही जी पापाराझींच्या वागण्यावर नाराज आहे. याबाबत अनेक सेलिब्रिटींच्या तक्रारी आहेत. आलिया भट्टने यापूर्वी घरी फोटो काढल्याबद्दल पापाराझींना फटकारले होते. अभिनेता राणा दग्गुबतीचाही विमानतळावर छायाचित्रकारांशी वाद झाला होता जेव्हा त्यांच्यापैकी एकाने चुकून त्याला धडक दिली होती. तर अशा पद्धतीने पापाराझींच्या मर्यादा ओलांडण्यावर अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान काजोल सध्या तिच्या पुढच्या ‘माँ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा एक हॉरर ड्रामा आहे आणि तो विशाल फुरिया दिग्दर्शित आणि देवगण फिल्म्स निर्मित आहे. ती यात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.