AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajol : ही तर दुसरी जया बच्चन… काजोलवर का भडकले नेटकरी ?

Kajol Video : सध्या काजाोल तिच्या आगामी चित्रपरटाच्या प्रमोशनमध्ये कूपच व्यस्त आहे. नुकतीच ती एका इव्हेंटमध्ये गेली होती, मात्र तिथे तिचं वागणं पाहून नेटकरी जाम भडकले. ही तर दुसरीजया बच्चनच आहे, असं म्हणत यूजर्सनी तिला खूपच ट्रोलही केलं.

Kajol : ही तर दुसरी जया बच्चन... काजोलवर का भडकले नेटकरी ?
| Updated on: Jun 20, 2025 | 1:09 PM
Share

Kajol Ignored Sunny Leone : बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री असलेली काजोलची सध्या सगळीकडे हवा आहे. ‘मां’ हा तिचा आगामी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. येत्या 27 जूनला हा चित्रपट रिलीज होणार असून काजोल त्यासाठीच प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे काजोल अनेक इव्हेंटसला हजेरी लावताना दिसत आहे. अलिकडेच ती एका कार्यक्रमात गेली होती जिथे सनी लिओनी देखील उपस्थित होती. मात्र काजोलने चक्क सनी लिओनीकडे दुर्लक्ष केलं. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काजोलने सनीला केलं इग्नोर

या व्हिडिओमध्ये सनी लिओनी पांढऱ्या रंगाच्या ड्रेस घालून पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे. काजोलही तिथे आली होती, मात्र सनी लिओनीला पाहून ती थांबली. फोटो काढून झाल्यावर सनी तेथून निघाली आणि ते पाहून काजोल लगेच रेड कार्पेटवर गेली. सनी लिओनीला हाय-हॅलो करणं तर सोडाचं काजोलने तिच्याक़डे ढुंकूनही पाहिलं नाही. ती सरळ रेड कार्पेटवर गेली आणि फोटोग्राफर्ससमोर पोझ देऊ लागली. ग्रीन साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मात्र काजोलचा हा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला असून तिचा हा स्वभाव अनेकांना खटकला. तिच्या या व्हिडीओवर शेकडो लोकं कमेंट्स करत असून अनेकांनी तिच्यावर टीका करत तिला ट्रोलही केलं. काजोलचा हा ॲटीट्युड खूप चुकीचा आहे असे लोक म्हणत आहेत. ही तर दुसरी जया बच्चनच आहे, अशी कमेंट एका युजरने लिहीली. मी सुद्धा काजोलला असंच इग्नोर करेन, असंही एकाने लिहीलं. काजोललला वाटतं तीच सगळ्यात वरचढ आहे अशा शब्दांत एका युजरने तिच्यावर टीका केली. तर सनी लिओनी काजोलपेक्षा चांगली दिसते असं म्हणत एकाने तिला ट्रोल केलं.

एकंदरच युजर्नसा काजोलचं हे वागणं खूप खटकल्याचं दिसत असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काजोलच्या या वागण्यामुळे तो खूप शेअर केला जात आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही करत त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

27 जूनला रिलीज होणार काजोलचा चित्रपट

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, काजोलचा ‘मां’ हा चित्रपट येत्या 27 जून रोजी प्रदर्शित होत आहे. हा एक पौराणिक-भयपट आहे. ज्यामध्ये काजोल तिच्या मुलीला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे.तिचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?