इतकी पूजा करूनही माझ्यासोबत…; त्या दोन प्रसंगांनंतर काजोलचा देवावरील विश्वासच उडाला
अभिनेत्री काजोलने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल सांगितले तसेच यामुळे तिचा देवावरचा विश्वास उडाला असल्याचंही तिने म्हटलं. काजोलने सांगितले की त्या काळात तिच्या मनात देवाच्या अस्तित्वाबद्दल खूप प्रश्न निर्माण झाले होते.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल तिच्या ‘माँ’ या चित्रपटावरून सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती बऱ्याच माध्यमांवर मुलाखत देत आहे. अशाच एका मुलाखतीदरम्यान काजोलने अनेक किस्से सांगितले. त्यातील एक म्हणजे तिचा देवावरचा उडालेला विश्वास. तिने तिच्या मनातील भावना यावेळी व्यक्त केल्या. काजोलचे दुर्गापूजेचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. ती देवीची खूप भक्तीभावाने पूजा करताना दिसते. तथापि, एक वेळ अशी होती जेव्हा तिचा देवावरील विश्वास उडाला होता. काजोलने एका मुलाखतीत सांगितले की, इतकी पूजा करूनही तिच्यासोबत काही प्रसंग असे का घडले? याचा तिला प्रश्न पडत होता. तो एक कठीण काळ होता आणि तिचा देवावरील विश्वास उडाला होता. तथापि, काही दिवसांनी सर्व काही ठीक झाले.
माझा देवावरचा विश्वास उडाला होता काजोलला एका मुलाखतीत तिच्या श्रद्धेबद्दल, तिच्या भक्तीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली की, ‘ एक काळ असा होता जेव्हा माझ्या सर्व श्रद्धा, भक्ती आणि प्रार्थनांचा काहीही परिणाम होत नव्हता. असे वाटत होते की फक्त माझ्याचबाबतीत हे का घडतंय? त्यामुळे देवाच्या अस्तित्वावरील विश्वास कमी होत चालला होता.’ काजोल म्हणाली की तिला असे वाटले होते की, इतक्या भक्ती आणि उपासनेनंतरही तिच्यासोबत असे प्रसंग का घडले.
View this post on Instagram
हळूहळू माझे मन बदलले काजोलने पुढे सांगितले की तो काळ सुमारे एक आठवडा चालला. तो संपूर्ण काळ प्रश्न आणि तणावाने भरलेला होता. काजोल म्हणाली ,’ते दिवस सोपे नव्हते. मी खूप अस्वस्थ होते.’ हळूहळू काजोलने स्वतःला पटवून दिले आणि तिला पटले की कदाचित यामागेही काहीतरी कारण असेल. कदाचित हे नशिबात नसेल. विश्वाच्या मनात काहीतरी वेगळेच असावे. असं माणून तिने स्वत:ला समजावले होते.
गर्भपात झाला या मुलाखतीत काजोलने तिचा देवावरचा विश्वास उडण्याचे कारण सांगितले नाही मात्र तिने मागील अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की तिचा दोनदा गर्भपात झाला होता. काजोल तिच्या आयुष्यातील हे कठीण काळ मानते. तिची मुलगी न्यासा आणि युगच्या जन्मापूर्वी काजोलचे दोन गर्भपात झाले होते. तेव्हा ती फार तणावात होती असंही तिने सांगितले होते.