AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांच्या बाबतीत आमिरची पसंत..; किरण रावसमोरच काजोल हे काय बोलून गेली?

'लगान' या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आमिरने मुंबईत मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. अभिनेत्री काजोलने या कार्यक्रमात आमिरसोबत एक गंमत केली.

महिलांच्या बाबतीत आमिरची पसंत..; किरण रावसमोरच काजोल हे काय बोलून गेली?
आमिर खान-गौरी स्प्रॅट, काजोलImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 14, 2026 | 2:14 PM
Share

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या सिल्वर ज्युबलीनिमित्त मुंबईत अत्यंत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील मोठमोठे सेलिब्रिटी उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा अभिनेत्री काजोल आणि जूही चावला यांच्या जुगलबंदीची होती. या दोघी अभिनेत्रींनी मंचावर आमिर खानसोबत विनोद केला. या कार्यक्रमादरम्यान जेव्हा काजोल आणि जूही चावला यांना मंचावर येऊन आमिरबद्दल काही बोलायला सांगितलं, तेव्हा या दोघींनी मजेशीर किस्से सांगत वातावरण हलकंफुलकं केलं.

यावेळी काजोल गंमतीने म्हणाली, “बरं मी आमिरबद्दल काय बोलू? एक गोष्ट मात्र खरी आहे की आमिर खान प्रॉडक्शन्सने हे सिद्ध केलंय की त्याची चित्रपटांची निवड खरोखरंच उत्कृष्ट आहे. ‘लगान’पासून आतापर्यंत त्याने जे काही केलं आहे ते सर्व उत्तम आहे आणि हो, अर्थात महिलांच्या बाबतीतही आमिरची निवड उत्कृष्ट आहे.” काजोलचे हे शब्द ऐकून आमिरला हसू अनावर होतं. याचवेळी मंचावर आमिरची पूर्व पत्नी किरण रावसुद्धा उपस्थित होती.

काजोलनंतर जूही चावलानेही आमिरची चेष्टा करण्याची संधी सोडली नाही. जूही हसत म्हणाली, “माझ्याकडे आमिरसाठी फक्त एक शब्द नाही, तर मला खूप काही सांगायचं आहे. जर मी त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली, तर आपली संपूर्ण संध्याकाळ त्यातच जाईल. आमिर खान प्रॉडक्शन्स सुरू होण्याच्या खूप आधी तो फक्त ‘एके’ होता. आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. तो त्याचा पहिला चित्रपट होता आणि बघा, ज्यांनी माझ्यासोबत आपल्या करिअरची सुरुवात केली, ते आज किती पुढे पोहोचले आहेत.”

पहा व्हिडीओ-

कार्यक्रमातील हलक्याफुलक्या विनोदांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘काजोल तुझं अगदी बरोबर आहे. आमिरची महिलांच्या बाबतीत निवड खरंच अप्रतिम आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘काजोल आणि जूही मस्करीच्या मूडमध्ये आहेत. किरण राव त्यांना बघत आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

आमिर खानचं पहिलं लग्न रीना दत्तासोबत झालं असून या दोघांना जुनैद खान आणि आयरा खान ही दोन मुलं आहेत. रीनापासून विभक्त झाल्यानंतर 2005 मध्ये आमिरने किरण रावशी दुसरं लग्न केलं. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. 2021 मध्ये आमिर आणि किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता जुलै महिन्यात आमिर खान गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न करणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा