AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | कंगना रनौतचं देवदर्शन, परिवारासमवेत पोहचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात! पाहा फोटो..

गेल्या काही दिवसांपासून मनाली येथे आपल्या कुटूंबियांसमवेत वेळ घालवत असलेली कंगना रनौत थेट सुवर्ण मंदिरात (Golden Temple) पोहोचली आहे. या दरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kangana Ranaut | कंगना रनौतचं देवदर्शन, परिवारासमवेत पोहचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात! पाहा फोटो..
कंगना रनौत
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: May 31, 2021 | 11:18 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कंगना प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास मागेपुढे पाहत नाही. ज्यामुळे ती बर्‍याचदा वादाच्या घेऱ्यात अडकते. गेल्या काही दिवसांपासून मनाली येथे आपल्या कुटूंबियांसमवेत वेळ घालवत असलेली कंगना रनौत थेट सुवर्ण मंदिरात (Golden Temple) पोहोचली आहे. या दरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत (Kangana Ranaut and her family visited golden temple Amritsar).

कंगनाने आपल्या कुटुंबियांसह सुवर्ण मंदिरात दर्शन घेत असल्याची छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले, ‘आज मी श्री हरमंदिर साहिब सुवर्ण मंदिरात गेले होते. मी लहानपणापासूनच उत्तरेत वाढली आहे आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने बर्‍याच वेळा सुवर्ण मंदिरात भेट दिली आहे. पण मी मात्र पहिल्यांदाच येथे गेले. सुवर्ण मंदिराचे सौंदर्य आणि देवत्व पाहून मी स्तब्ध झाले आहे.’

पाहा कंगनाची पोस्ट

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही बरेच फोटो शेअर केले आहेत. हजारो लोकांना तिची ही छायाचित्रे आवडली आहेत. तिच्या चाहत्यांना या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तिचे चाहते या पोस्टवर कमेंट देखील करत आहेत. त्याच वेळी एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘कुणास ठाऊक गुरु दर्शन घेतल्यावर कंगनाला सद्बुद्धी येईल..’(Kangana Ranaut and her family visited golden temple Amritsar)

शीखांची मने जिंकण्याचा प्रयत्न?

तर, दुसरीकडे कंगना रनौत आता शीखांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, असे देखील म्हटले जात आहे. शेतकरी चळवळी दरम्यान कंगना आणि पंजाबी गायक दिलजित दोसांझ यांचे जोरदार ‘ट्विटर’ युद्ध झाले. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना बरेच काही ऐकवले होते. इतकेच नाही तर दिल्लीच्या गुरुद्वारा शीख व्यवस्थापन समितीने कंगनाविरोधात पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली होती.

कंगनाच्या चित्रपटांची प्रतिक्षा

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, कंगना रनौतचा ‘थलायवी’ हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे तो पुढे ढकलला गेला आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. राजकारणापासून, चित्रपट कारकिर्दीत त्यांच्या योगदानावर हा चित्रपट आधारित असेल. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, कंगनाचा अभिनयही प्रेक्षकांना खूप आवडला आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय ती ‘तेजस’ आणि ‘धाकड’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(Kangana Ranaut and her family visited golden temple Amritsar)

हेही वाचा :

Photo : साराभाई V/S साराभाई ते ऑफिस ऑफिसपर्यंत, या टीव्ही मालिकांची होती चाहत्यांना भुरळ

Amitabh Bachchan | ‘अब तक 52’, खास पोस्ट शेअर करत ‘बिग बीं’नी दिला बॉलिवूडमधील 52 वर्षाच्या कारकिर्दीला उजाळा!

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...