Manikarnika Returns | ‘पंगा क्वीन’च्या नव्या चित्रपटाची घोषणा, ‘काश्मीरच्या राणी’च्या भूमिकेत दिसणार कंगना!

चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगना रानौतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

Manikarnika Returns | ‘पंगा क्वीन’च्या नव्या चित्रपटाची घोषणा, ‘काश्मीरच्या राणी’च्या भूमिकेत दिसणार कंगना!

मुंबई : ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका सकारात सर्वांचे मन जिंकल्यानंतर बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आता लवकरच ‘मणिकर्णिका रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. ‘मणिकर्णिका’मध्ये झांसीच्या राणीची कथा दाखवली गेली होती. तर या आगामी ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटात काश्मीरच्या राणी कथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगना रानौतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे (Kangana Ranaut Announce her new film Manikarnika Returns).

कमल जैन सोबतचा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘झाशीच्या राणीसारख्या अनेक वीरांगनांच्या शौर्याचा साक्षी आपला भारत देश आहे. अशीच आणखी एक समोर न आलेली वीर कथा म्हणजे काश्मीरच्या राणीची, ज्यांनी महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केले. लवकरच कमल जैन आणि मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.’ रिपोर्ट्सनुसार कंगनाने गेल्या आठवड्यात कमल जैन यांच्याशी बोलून चित्रपटाच्या पटकथेवर शिक्कामोर्तब केला होता.

(Kangana Ranaut Announce her new film Manikarnika Returns)

‘धाकड’च्या चित्रीकरणात व्यस्त कंगना

कंगना रानौत सध्या ‘धाकड’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात कंगना रानौत ‘बाल तस्करी’ आणि ‘महिला शोषणा’विरोधात लढा देताना दिसणार आहे.

अलीकडेच कंगनाने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशात ‘धाकड’ करमुक्त करू शकतात, असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांनी कंगनाला चित्रपटासंदर्भात काही सूचनाही दिल्या, ज्या कंगनाने नमूद केल्या आहेत. याविषयी सांगताना कंगना म्हणाली, ‘आपण चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय महिलांची ताकद का दाखवत नाही आहोत. त्यांनी मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. आपली टीम या प्रकरणात लक्ष देईल आणि राज्यात हा चित्रपट करमुक्त होऊ शकतो, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.’

यापूर्वी चित्रिकरणादरम्यानचे कंगनाचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत कंगनाची ‘धाकड’गिरी दिसून आली होती. यावेळी कंगनाने शर्ट आणि ब्लॅक जॅकेटसह जीन्स परिधान केली होती. या फोटोत कंगनासमवेत चित्रपटाच्या टीम सदस्यही दिसले होते.

(Kangana Ranaut Announce her new film Manikarnika Returns)

Published On - 3:11 pm, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI