कंगणाने रणवीर कपूरला झापले… म्हणाली, लोकांना महिलांवरील…
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कंगना राणावत आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतंय. कंगना राणावत हिने नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

मुंबई : कंगणा राणावत ही कायमच चर्चेत राहणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कंगणा राणावत सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. कंगणा राणावत आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. कंगणा राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूड कलाकार आणि चित्रपट असतात. कंगना राणावत कायमच करण जोहर याच्यावर टिका करताना दिसते. मध्यंतरी एक चर्चा होती की, कंगणा राणावत ही बाॅलिवूड चित्रपटांनंतर आता राजकारणामध्ये धमाका करणार आहे.
लोकसभा निवडणूक कंगना राणावत लढणार असल्याचे देखील सांगितले जात होते. कंगणा राणावत सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. नुकताच आता कंगणा राणावत हिने रणबीर कपूर याच्या ॲनिमल चित्रपटावर टिका करताना दिसतंय. यावेळी कंगणा राणावत हिने चांगलाच संताप व्यक्त केल्याचे बघायला मिळतंय. आता कंगणा राणावत हिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
कंगना राणावत हिने पोस्ट शेअर करत चांगलाच क्लास लावल्याचे बघायला मिळतंय. या पोस्टमध्ये कंगना राणावत हिने थेट म्हटले की, लोकांना महिलांवरील अत्याचाराचे चित्रपट आवडतात. करण जोहर आणि त्याच्या टोळीला तिचे करिअर संपवायचे आहे. कंगना म्हणाली की, अशा अॅनिमल सारख्या चित्रपटाला यश मिळते हे अत्यंत धोकादायक नक्कीच आहे.
विशेष म्हणजे कंगना राणावत हिने हे उत्तर एका महिला चाहत्याच्या ट्विटला दिले आहे. पुढे कंगना म्हणाली, मी खूप जास्त मेहनत माझ्या चित्रपटांसाठी घेते. परंतू लोकांना हे अशाप्रकारचे चित्रपट आवडतात, ज्या चित्रपटांमध्ये महिलांवर अत्याचार केले जातात. ज्या चित्रपटांमध्ये थेट महिलांना शूज चाटण्यास सांगतात. हे चित्रपट महिला सक्षमीकरणावर चित्रपट बनवणाऱ्या व्यक्तीसाठी धक्कादायक नक्कीच आहेत. एकप्रकारे रणबीर कपूर याला झापतानाच कंगना दिसत आहे.
आता कंगना राणावत हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण हे कंगना राणावत हिच्या या पोस्टवर कमेंट करताना देखील दिसत आहेत. कंगना राणावत हिच्या पोस्टला काही लोकांनी सपोर्ट देखील केलाय. विशेष म्हणजे हे पहिल्यांदाच घडले नाही की, कंगना राणावत हिने अशाप्रकारची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. कंगना कायमच सोशल मीडियावर बाॅलिवूड चित्रपटांवर टीका करणाऱ्या पोस्ट शेअर करते.
