पैसा आल्यानंतर बदलला कपिल शर्मा? अर्चना सिंगने सांगितलं पडद्यामागचं सत्य

Kapil Sharma | सर्वांना पोट धरुन हसवणारा कपिल शर्माचं पडद्यामागचं सत्य समोर, अर्चना सिंगने केलाय मोठा खुलासा... पैसा आल्यानंतर बदलला आहे कपिल शर्मा? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कपिल शर्मा आणि अर्चना सिंग हिच्या वक्तव्याची चर्चा... मोठं सत्य अखेर समोर आलंच...

पैसा आल्यानंतर बदलला कपिल शर्मा? अर्चना सिंगने सांगितलं पडद्यामागचं सत्य
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 11:00 AM

विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. स्वतःचं कौशल्य आणि मेहनतीने कपिल याने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कपिल आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. ‘द कपिल शर्मा’ शोचा कायम चाहत्यांमध्ये बोलबाला असतो. काही दिवसांपूर्वी ‘द कपिल शर्मा’ ऑफएअर गेला होता. पण मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा ‘द कपिल शर्मा’ शो चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. सध्या सर्वत्र कपिल शर्मा आणि त्याच्या आगामी शोची चर्चा रंगली आहे.

कपिल शर्मा आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आता चाहत्यांना कपिल याला ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता येणार आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ 30 मार्च पासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सांगायचं झालं तर, 26 मार्च रोजी शीच्या टीमने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक खुलासे केले.

परिषदे अर्चना पुरन सिंग हिला कपिल याच्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. ‘एवढ्या वर्षांमध्ये कपिल किती बदलला आहे?’ असा प्रश्न विचारल्यानंतर अर्चना म्हणाली, ‘कपिल याच्यामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. तो पूर्वी जेवढी कॉमेडी करायचा आता त्यापेक्षा जास्त करतो..’

हे सुद्धा वाचा

‘कॉमेडी शिवाय कपिलमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. तो छोट्या शहरातून आला आहे. पण त्याचं मन फार मोठं आहे. मी कपिल याला खूप वर्षांपासून ओळखते, त्याच्यामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत… आम्ही प्रत्येक जण एकमेकांसोबत प्रेम आणि आदराने राहतो…’

‘आमच्या कोणामध्ये कोणतेच मतभेद नाहीत. कपिल याची सर्वात मोठी आणि खास गोष्ट म्हणजे, तो कधीच सेटवर कोणत्याही प्रकारणाचा नकारात्मक वातावरण तयार होऊ देत नाही.’ असं देखील अर्चना कपिल याच्याबद्दल म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्चना हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सात वर्षांनंतर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चाहत्यांच्या भेटीस येत आहे. शोमध्ये कपिल आणि सुनील यांची जोडी पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यामुळे दोघांना पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शोचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.