Nisha-Karan Mehra | करण-निशाच्या वादानंतर सोशल मीडियावर चर्चेत आलाय ‘हा’ बेडरूम व्हिडीओ ! 

टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध जोडी निशा रावल (Nisha Rawal) आणि करण मेहरा (Karan Mehra) यांच्या वादाची चर्चा अजूनही सुरू आहे. काहीजण निशाचे समर्थन करत आहेत, तर काही जण करणला पाठिंबा देत आहेत. पण आता या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जोडप्याचा एक बेडरूम व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Nisha-Karan Mehra | करण-निशाच्या वादानंतर सोशल मीडियावर चर्चेत आलाय ‘हा’ बेडरूम व्हिडीओ ! 
करण-निशा

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध जोडी निशा रावल (Nisha Rawal) आणि करण मेहरा (Karan Mehra) यांच्या वादाची चर्चा अजूनही सुरू आहे. काहीजण निशाचे समर्थन करत आहेत, तर काही जण करणला पाठिंबा देत आहेत. पण आता या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जोडप्याचा एक बेडरूम व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळातील आहे (Karan Mehra And Nisha Rawal bedroom video goes viral on internet after their clashes).

एकीकडे करण आणि निशाच्या वादाची जोरदार चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे त्यांचा हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे.

व्हिडीओत दिसला करणचा अरसिकपणा

वास्तविक हा व्हिडीओ निशाने स्वत: तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निशा तिचा पती करणशी काही कंटेंटबद्दल बोलत आहे. पण, आपण पाहू शकतो की, करण निशाच्या या चर्चेमध्ये अजिबात रस घेत नाही. तो निशाशी अत्यंत उद्धटपणे वागतोय.

हा व्हिडीओ निशाने लॉकडाऊनच्या आठवणी म्हणून शेअर केला होता, ज्यामध्ये निशा सांगते की, ‘लोकांना आम्हाला एकत्र पाहायचे आहे. चल काहीतरी मजेदार व्हिडीओ बनवूया.’ पण यासाठी करणने नकार दिला. मग निशा म्हणाली, आपण फक्त नात्यावर बोलूया. ज्यानंतर निशा म्हणते की, मुलींना मुलांबरोबर व मुलांना मुलींबरोबर काय त्रास होतो? यावर बोलूया.. त्याला उत्तर म्हणून करण थेट ‘निशा’च एक समस्या असल्याचे सांगतो.

पाहा व्हिडीओ :

 (Karan Mehra And Nisha Rawal bedroom video goes viral on internet after their clashes)

निशाने केली करणची पोल-खोल

पती करण मेहरा याच्याविरोधात एफआयआर नोंदविल्यानंतर अलीकडेच निशा रावल हिने माध्यमांशी बोलताना संपूर्ण परिस्थिती सांगितली. स्वतःवर झालेल्या हल्ल्यानंतर तिने त्याचे काही फोटो देखील माध्यमांना दाखवले. हे फोटो समोर आल्यानंतर, आपला बचाव करत करणने निशाला ‘वेडी’ म्हटले होते. त्याला उत्तर देताना निशा म्हणाली होती की, ‘मी मानसिक आजाराणे ग्रस्त होते, पण आता माझ्यावरील उपचार पूर्ण झाले आहेत आणि मी पूर्णपणे ठीक आहे’.

का तुटलं निशा आणि करणचं नातं?

मीडियाशी बोलताना निशाने सांगितले होते की, करणचे दिल्ली स्थित एका मुलीशी अफेयर सुरु आहे. त्याला आता तिच्याबरोबर राहायचे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो चंदीगडमध्ये शूटिंग करत होता. जिथे माझ्या विचारण्यावर आता त्याने काबुल केले आहे की, त्याचा त्या मुलीशी भावनिक आणि शारीरिक संबंध आहे. ज्यामुळे त्याला घटस्फोट हवा आहे. पण 31 मेच्या रात्री आमच्यात काही वाद झाले आणि त्यावेळी त्याने माझे डोके भिंतीवर आपटले आणि त्यानंतर माझ्या कपाळातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतरच मी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला.

(Karan Mehra And Nisha Rawal bedroom video goes viral on internet after their clashes)

हेही वाचा :

Photo: दिलखुलास हास्य… स्टायलिश फोटो… ती सोशल मीडियावर परत आलीय; हीना खानचे फोटो पाहाच!

‘आई-बाबा कधी बनणार?’, कुटुंब नियोजनाच्या प्रश्नावर मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवरचं बेधडक उत्तर!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI