AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | ‘मी आई होणार नाही, पण…’, सैफ याच्यासोबत लग्न करण्याआधी करीना हिने साराला दिलं होतं वचन

सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याआधी करीनाने सावत्र मुलगी सारा हिला दिलं होतं वचन, 'त्या' वचनामुळे सारा - करीनाचं नातं आज वेगळ्या टप्प्यावर

Kareena Kapoor | 'मी आई होणार नाही, पण...', सैफ याच्यासोबत लग्न करण्याआधी करीना हिने साराला दिलं होतं वचन
| Updated on: Jun 28, 2023 | 10:10 AM
Share

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. करीना कपूर खान हिच्यासोबत सैफ याने दुसरा संसार थाटला आहे. पण अभिनेत्याने कधीही पहिली पत्नी अमृता सिंग हिच्या मुलांना स्वतःपासून दूर केलं नाही. आजही अनेक ठिकाणी सैफ मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान यांच्यासोबत दिसतो. एवढंच नाही तर, सैफ याच्या दुसऱ्या कुटुंबासोबत देखील सारा आणि इब्राहिम यांचे चांगले संबंध आहेत. महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा सैफ आणि करीना यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. तेव्हा सारा – इब्राहिम मोठे होते आणि लग्नाआधी करीना दोघांसोबत महत्त्वाच्या गोष्टी बोलली होती.

२०१२ मध्ये करीना – सैफ यांनी निकाह केला. त्यानंतर करीना हिच्यासोबत सारा आणि इब्राहिम यांचं नातं अधिकल घट्ट झालं. पण यामागे देखील एक मोठं कारण आहे. ज्यामुळे सैफच्या पहिल्या पत्नीच्या मुलांचं करीनासोबत चांगलं नातं आहे. या गोष्टीचा खुलासा खुद्द सारा अली खान हिने एका मुलाखतीत केला होता..

दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सारा अली खान हिला काही प्रश्न विचारले होते. ‘करीनाला कोणत्या नावाने हाक मारते, तू करीनाला ‘छोटी माँ’ या नावाने हाक मारते? यावर सारा अली खान हिने दिलेलं उत्तर आजही फार कमी चाहत्यांना माहिती आहे.

सारा अली खान म्हणाली, ‘वडीलांनी कधीही करीना तुमची छोटी आई आहे.. यासाठी दबाव टाकला नाही. मी तिला कधी ‘के’ तर कधी करीना म्हणून हाक मारते.. एवढंच नाही तर, करीनाने देखील कधी आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही…’ असं सारा म्हणाली होती..

सैफ अली खान याच्या सोबत लग्न करण्याआधी करीना हिने सारा आणि इब्राहिम यांच्यासोबत संवाद साधला होता. यावर देखील साराने मौन सोडलं आहे. सारा म्हणाली, ‘लग्नाआधी करीना म्हणाली, तुमची आई एक उत्तम व्यक्तिमत्व आहे, आपलं मैत्रीचं नातं असावं एवढची माझी इच्छा आहे…’

यावर करीनाने देखील मोठं वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत करीना म्हणाली, ‘लग्नाच्या एक दिवस आधीच सैफ याला सांगितलं होतं की, कधीही सारा आणि इब्राहिम यांची आई होण्याचा प्रयत्न करणार नाही. पण जेव्हा दोघांना गरज वाटेल तेव्हा एक चांगली मैत्रीण म्हणून दोघांच्या सोबत असेल…’ सध्या सर्वत्र सैफ अली खान याच्या दोन कुटुंबाच्या चर्चा तुफान रंगल्या आहेत.

२०१२ मध्ये सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर करीनाला टीकेचा सामना करावा लागला होता. पण करीना आणि सैफ यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं. सैफ आज त्याच्या दुसऱ्या कुटुंबासोबत आनंदी आहे. सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलांची नावे तैमूर आणि जेह.. अशी आहेत.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.