Kareena Kapoor | ‘महिला दिना’च्या निमित्ताने करीनाने शेअर केला ‘छोट्या नवाबा’चा फोटो, पहा कसा दिसतो तैमुरचा भाऊ…

‘एक स्त्री करू शकत नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही’, असे कॅप्शन देत करीना कपूर-खानने सगळ्या महिला चाहत्यांना ‘जागतिक महिला दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहे.

Kareena Kapoor | ‘महिला दिना’च्या निमित्ताने करीनाने शेअर केला ‘छोट्या नवाबा’चा फोटो, पहा कसा दिसतो तैमुरचा भाऊ...
करीना कपूर

मुंबई : ‘एक स्त्री करू शकत नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही’, असे कॅप्शन देत करीना कपूर-खानने सगळ्या महिला चाहत्यांना ‘जागतिक महिला दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहे. केवळ शुभेच्छाच नाही तर, यावेळी करीनाच्या घरी आलेल्या चिमुकल्या पाहुण्याची पहिली झलक देखील पाहायला मिळाली. करीनाने सोशल मीडियावर घरातील सर्वात ‘छोट्या नवाबा’चा पहिला-वहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोत बाळाचा चेहरा दिसत नसला, तरी त्याची पहिली झलक मात्र चाहत्यांना दिसली आहे (Kareena Kapoor Share first photo of newborn son on social media).

करीना-सैफच्या घरी आगमन झालेल्या या चिमुकल्या पाहुण्याला पाहण्यासाठी दोघांचेही चाहते उत्सुक आहेत. अशावेळी करीनाने खास महिला दिनाचे औचित्य साधत दुसऱ्या लेकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. करीना आणि सैफच्या चाहत्यांना या चिमुकल्या पाहुण्याच्या नावाची प्रतीक्षा आहे.

पाहा कसा दिसतो तैमुरचा भाऊ!

(Kareena Kapoor Share first photo of newborn son on social media)

पुन्हा छोटा नवाब

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफअली खान यांना 21 फेब्रुवारी रोजी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. शनिवारी (20 फेब्रुवारी), रात्री करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी करीना कपूरची प्रसुती झाली. करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती.

यापूर्वी 2016मध्ये जेव्हा करीना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यानच्या काळात तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता (Kareena Kapoor Share first photo of newborn son on social media).

गरोदरपणात कायम अ‍ॅक्टिव असलेली एकमेव अभिनेत्री!

करीना ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री अशी होती जिने गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केले आहे. अनेकदा करीना इव्हेंट्सला हजर राहायची. तर, कधी पत्रकारांशी ती संवाद साधायची. प्रसुतीच्या दोन दिवसांपूर्वीच ती अमृता अरोराच्या पोस्ट-ख्रिसमस बॅशमध्ये सहभागी झाली होती.

याशिवाय, प्रेग्नंसीच्या काळात करीनाने घरात बसून न राहता करीना मैत्रीणींसोबत आऊटिंगही केले होते. अलीकडेच करीना तिच्या मैत्रिणी मलायका आणि अमृता अरोरासोबत Tip & Toe Nail Club या स्पाबाहेर दिसली होती.

बाळाच्या नावाची चर्चा!

तैमुरच्या जन्मावेळी त्याच्या नावावरून बरेश वाद रंगले होते. या वेळी तैमुरच्या नावाचे स्पष्टीकरण देताना करीना आणि सैफने आपल्या मनात आणखी एक नाव असल्याचे म्हटले होते. हे नाव होते ‘फैज’. त्यामुळे आता या दुसऱ्या बाळाचे नाव काय ठेवणार?, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. तर, दुसरीकडे याचे नाव ‘फैज’ असू शकते, असे काही जणांचे म्हणणे आहे.

(Kareena Kapoor Share first photo of newborn son on social media)

हेही वाचा :

Vamika | ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने विराट कोहलीची लेकीसाठी खास पोस्ट, वाचा काय म्हणाला विराट…

प्रल्हाद शिंदेची ‘अंतिम इच्छा’, ‘या’ कॅसेटसाठी पत्नीचे दागिने मोडले; आनंद शिंदेंचा मन हेलावणारा किस्सा

Published On - 2:56 pm, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI