AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीना ते अक्षरा.. MMS स्कँडलचा सामना केलेल्या अभिनेत्रींच्या करिअरवर काय परिणाम झाला?

MMS लीकप्रकरणी अंजली अरोरानंतर अक्षरा सिंहचं नाव; व्हिडीओ खरा की खोटा?

करीना ते अक्षरा.. MMS स्कँडलचा सामना केलेल्या अभिनेत्रींच्या करिअरवर काय परिणाम झाला?
MMS स्कँडलचा सामना केलेल्या अभिनेत्रींच्या करिअरवर काय परिणाम झाला?Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 3:50 PM
Share

भोजपुरी इंडस्ट्रीची बोल्ड अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) तिच्या MMS लीक (MMS Leak) प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एमएमएस व्हिडीओ हा अक्षराचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अक्षराने या चर्चा फेटाळल्या आहेत. सोशल मीडियावर एखाद्या अभिनेत्रीचा खासगी व्हिडिओ लीक होण्याची ही काही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीही अनेक अभिनेत्री एमएमएस लीकमुळे वादात सापडल्या आहेत. या वादाचा अभिनेत्रींच्या करिअरवर काय परिणाम झाला, ते जाणून घेऊयात..

अंजली अरोरा- अक्षराच्या आधी काही दिवसांपूर्वी ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचा खाजगी व्हिडिओ लीक झाला होता. व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी अंजली असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर अंजलीनेही प्रतिक्रिया देत ट्रोलर्सना सुनावलं होतं. या लीक व्हिडिओचा अंजलीच्या करिअरवर फारसा परिणाम झाला नाही. ती आजही लोकप्रिय सोशल मीडिया स्टार्सपैकी एक आहे.

करीना कपूर- एमएमएस लीक प्रकरणाच्या यादीत अभिनेत्री करीना कपूरचाही समावेश होतो. जेव्हा करीना शाहिद कपूरला डेट करत होती, तेव्हा तिचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये करीना आणि शाहीद लिपलॉक करताना दिसले होते. त्याच्या काही काळानंतर करीना आणि शाहिदचं ब्रेकअप झालं. या खाजगी व्हिडिओचा आणि शाहिदसोबतच्या ब्रेकअपचा करिनाच्या करिअरवर कधीही परिणाम झाला नाही. ती सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

मल्लिका शेरावत- मल्लिका शेरावतला तिच्या एमएमएस स्कँडलमुळे खूप टीकेला सामोरं जावं लागलं होतं. मल्लिका तिच्या बोल्ड स्टाइलमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत होती. अशा परिस्थितीत जेव्हा तिचा खासगी व्हिडिओ लीक झाला तेव्हा लोकांनी तिला खूप ट्रोल केलं. मल्लिकाने काही दिवसांपूर्वीच सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आहे.

शिल्पी राज- भोजपुरी गायिका शिल्पी राजदेखील तिच्या एमएमएसमुळे चर्चेत होती. नंतर तिने पुढे येऊन या संपूर्ण प्रकरणावर खुलासा केला. या संपूर्ण वादाचा शिल्पीच्या करिअरवर फारसा परिणाम झाला नाही. तिची गाणी आजही भोजपुरी इंडस्ट्रीत सुपरहिट ठरत आहेत.

हंसिका मोटवानी- एमएमएस लीक झाल्यानंतर अभिनेत्री हंसिका मोटवानीही चर्चेत आली. बाथटबमध्ये अंघोळ करताना एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ हंसिकाचा असल्याचं म्हटलं जात होतं. हंसिकाने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. सध्या ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.

Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.