Birthday Wish : तैमूरच्या वाढदिवसानिमित्त करीना कपूरची खास पोस्ट. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा

Birthday Wish  : तैमूरच्या वाढदिवसानिमित्त करीना कपूरची खास पोस्ट. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा

आज करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खानचा वाढदिवस आहे. (Kareena Kapoor's special post on Taimur's birthday)

VN

|

Dec 20, 2020 | 2:48 PM

मुंबई : आज करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खानचा वाढदिवस आहे. तैमूरच्या वाढदिवसाला त्याची आई करीना कपूरनं एक खास व्हिडिओ शेअर केला आणि तैमुरसाठी जबरदस्त कॅप्शनही लिहिलं. या व्हिडिओमध्ये, तैमुर कुठे बर्फात खेळताना दिसतोय तर कुठे गायीसाठी चारा उचलताना. हा गोड व्हिडिओ शेअर करत करीनानं तैमूरला आयुष्यात आनंदी राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच तिनं तैमूरच्या हार्डवर्क आणि डेडिकेशनचं कौतुकही केलं आहे.

‘तैमूर… वयाच्या 4 थ्या वर्षीच तुझ्यात इतकं डेडिकेशन पाहून मी खूप आनंदी आहे. तुझं हार्डवर्क पाहून मला बरं वाटतं जसं की गायीसाठी चारा आणून तिला खाऊ घालणं. मात्र हे विसरू नकोस की तुला बर्फची टेस्ट करायची आहे, फुलं तोडायची आहेत, उड्या मारायच्या आहेत, झाडावर चढायचं आहे आणि हो पूर्ण केक खायचा आहे.’ , ‘तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर आणि जीवनात अशी प्रत्येक गोष्ट करा ज्यामुळे तुला आनंद मिळेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… माय टिम.’ असं कॅप्शन देत करीनानं तैमुरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तैमूरवेळी केलेल्या चुकांची मी पुनरावृत्ती करणार नाही करीनानं एका मुलाखती दरम्यान सांगितलं की, ‘जेव्हा तैमूर माझ्या पोटात होता, तेव्हा प्रत्येकजण मला भरपूर खायला सांगायचे. सारखं पराठा खा, तूप खा, दूध घे आणि म्हणूनच माझं वजन 25 किलोनं वाढलं होतं. मात्र यावेळेस मला पुन्हा त्याच चुकांची पुनरावृत्ती करण्याची इच्छा नाही. मला माहित आहे की माझ्या शरीराची काय गरजेच आहे.’

शर्मिला टागोर यांनी व्यक्त केली काळजी तैमूरची आजी शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत तैमूरला मिळत असलेल्या मीडिया अटेंशनबद्दल सांगितलं होतं, ‘मला तैमूरची काळजी वाटते. तैमूर सध्या खूप लहान आहे त्यामुळे त्याला सध्या काही कळत नाही, मात्र जेव्हा तो मोठा होईल आणि जर तेव्हा त्याला अटेंशन मिळालं नाही तर मग त्याच्यावर खूप परिणाम होतील. म्हणूनच आम्हाला त्याची काळजी वाटते.’ सोबतच शर्मिला यांनी मीडियाला एक विनंती देखील केली होती, ‘तैमुर खूप साधा आहे. त्यामुळे मीडियानं त्याच्या संदर्भात थोडं सेंसिटिव्ह राहावं.’ असं त्या म्हणाल्या होत्या.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें